Home » क्रीडा, ठळक बातम्या » अमेरिकेचा घानावर २-१ ने निसटता विजय

अमेरिकेचा घानावर २-१ ने निसटता विजय

=इराण, नायजेरिया ०-० ने बरोबरीत=
नताल, [१७ जून] – ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकाने विजय नोंदविला. तर नायजेरिया व इराण या संघातील लढत ०-० ने बरोबरीत सुटली. २०१४ च्या स्पर्धेत बरोबरीत लढत राहण्याचा हा पहिलाच सामना होता.
नताल येथे झ्रालेल्या सामन्यात अमेरिका संघाने घाना संघाचा २-१ गोलने पराभव करून गत आठ वर्षात झालेल्या दोन विश्‍व करंडकातील पराभवाचे उट्टे काढले. यंदाच्या स्पर्धेत लढत १-१ गोलने बरोबरीत सुटणार होती. पण खेळातील ८६ व्या मिनिटाला बदली खेळाडू जॉन ब्रुक्स याने निर्णायक गोल झळकवून अमेरिकेला २-१ ने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ब्लॅकस्टार्स या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणार्‍या घाना संघाने गत दोन विश्‍व स्पर्धेत अमेरिकेचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा घाना त्यांच्यावर विजयाची हॅटट्रिक करणार असे वाटत होते. तर दुसरीकडे मोठ्या संख्येत उपस्थित अमेरिका प्रेक्षकांसमक्ष अमेरिका संघाने घानाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
यंदा अमेरिकाने कमालीचा खेळ सादर केला. खेळ सुरू होत नाही तोच मिडफिल्डर क्लिटं डम्पसे याने घानावर गोल नोंदवून अमेरिकेला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यावेळी पहिला मिनिटाचा खेळही पूर्ण व्हावयाचा होता.अमेरिका यंदाचा सामना जिंकणार असे वाटत होते.
खेळातील ८१ मिनिटेपर्यंत अमेरिकेने एका गोलची आघाडी कायम ठेवली होती. सामना संपण्यास केवळ ९ मिनिटे शेष होती. घाना संघातील आंद्रे आयु याला अलामोआ याने अप्रतिम पास दिला, त्यावर आंद्रे याने गोल करून सामना १-१ गोलने बरोबरीत आणला. चार वर्षांपूर्वी झालेल्या विश्‍व करंडकातही घाना संघाने अमेरिकेला पराभूत करताच त्यांचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाला होता.
यंदा अमेरिकेच्या मदतीला २० वर्षीय जॉन ब्रुक्स धावून आला. खेळातील ८६ व्या मिनिटाला अमेरिकेला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर ग्रॅहम मसी याने मारलेल्या किकवर चेंडू ब्रुक्सकडे येताच त्याने हेडिंगवर गोल करून अमेरिकेला २-१ ची आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम होती. गत दोन विश्‍व करंडकातील पराभवाचे उट्टे अमेरिकेने काढले. ब्रुक्स याने गोल करताच तो मैदानावरच लेटला. अभिनंदन करण्यासाठी संघातील सर्व खेळाडू त्याच्याजवळ आले पण २० वर्षीय ब्रुक्स काहीच हालचाल करीत नव्हता. इतका आनंद त्याला झाला होता.
ब्रुक्स इतक्यातच अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात दाखल झाला होता व गत चार आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला एकही आंतरराष्ट्रीय गोल करता आला नव्हता. पण त्याने विश्‍व करंडकात आणि तेही घानाशी खेळताना गोल केला. सामना संपल्यानंतर दर्शकांनी यूएस, यूएस अशा घोषणा दिल्या.
अमेरिकेचे प्रशिक्षक जर्गेन क्लिन्समॅन म्हणाले की, आजचा सामना जणू अंतिम सामनाच वाटत होता. विश्‍व करंडकाच्या इतिहासात अमेरिकेला अनेक विश्‍व करंडकात भाग घेता आला. पण त्यांच्या संघातील बदली खेळाडूने विजयी गोल करण्याचा पहिला मान मिळविला. तो मान ब्रुक्सच्या नावावर नोंदला गेला.
कुर्तिबा येथे नायजेरिया व इराण या संघातील लढत ०-० ने बरोबरीत सुटली. दोन्ही संघांना एकही गोल न करता आल्याने सामना ०-० गोलने बरोबरीत सुटला. यंदाच्या विश्‍व स्पर्धेतील ही पहिली लढत बरोबरीत सुटली. पूर्वार्धातील खेळात नायजेरियाचा संघ वरचढ होता. पण उत्तरार्धात त्यांना लय सापडली नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13605

Posted by on Jun 18 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2415 of 2455 articles)


रिओ डी जानेरिओ, [१७ जून] - विश्‍वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेहमीच दडपण असते. त्यातही स्पर्धेची विजयी सुरुवात करीत तीन ...

×