Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » अमेरिकेत थंडीचा कहर, समुद्राच्या लाटा गोठल्या

अमेरिकेत थंडीचा कहर, समुद्राच्या लाटा गोठल्या

NAIGARA FALL COLDन्यूयॉर्क, [२८ फेब्रुवारी] – अमेरिकेत थंडीने कहर केला आहे. आतापर्यंत फेब्रुवारीमध्ये सर्वात जास्त हिवाळा राहिला आहे. अमेरिकेमध्ये थंडीने मागील ६५ वर्षांतील विक्रम मोडला आहे. न्यू इंग्लंडमध्ये परिस्थिती इतकी खराब आहे की, थंडीमुळे सागरीलाटा गोठण्यास प्रारंभ झाला आहे. हवामान खात्याने वेगवान हिमवारे येण्याचा इशारा दिला आहे. गोठलेल्या लाटा मॅसेच्यूसेट्‌सचे जोनाथन निमरफ्रोहने कॅमेर्‍यात कैद केल्या आहे.
निमरफ्रोह यांनी सांगितले की, मी जेव्हा समुद्रकिनार्‍याकडे जात होतो, तेव्हा किनार्‍यापासून जवळजवळ ३०० यार्ड लांबीपर्यंत समुद्र गोठला होता. लाटा जशा होत्या तश्याच गोठल्या होत्या. बहुतेक लाटा दोन फुट उंचीपर्यंत गोठल्या होत्या. हे दृश्य आजपर्यंत कधीच कुणी पाहिले नव्हते, असे त्यांनी सांगितले.
हवामान विभागानुसार डेट्रॉईट आणि डेस मोइन्समध्ये तापमान उणे ४ ते उणे ११ राहणार आहे. दुसरीकडे आज शनिवारपासून शिकागो, पिट्‌सबर्ग आणि फिलाडेल्फियामध्ये ही थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20971

Posted by on Mar 1 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2003 of 2458 articles)


तर बदल करण्याची तयारी श्रेय तुम्ही घ्या, पण विधेयक पारित करायला सहकार्य करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना आवाहन ...

×