Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, फिचर » अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती

अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती

food_displayनवी दिल्ली, [१५ जानेवारी] – भारतीय खाद्यपदार्थ अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत आहेत. तेथे गेल्यास इडली, डोसा आणि चाटसहित अनेक भारतीय खाद्यपदार्थ सहजपणे मिळू शकतात. विदेशात भारतीय खाद्यबाजाराचा विस्तार होताना पाहून देशाची लोकप्रिय रेस्टॉरंट चेन ‘मोती महल’ समवेत अनेक अन्य रेस्टॉरंट्‌सनी तेथे आपला विस्तार केला आहे.
न्यूयॉर्कमध्ये भारतीय हॉटेलांची रेलचेल
वर्तमानकाळात अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जवळपास ४०० भारतीय रेस्टॉरंट्‌स व्यवसाय करत आहेत. अशा स्थितीत तेथे देशी खाणे शोधणे कठीण नाही. तेथे भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थांचा लाभ घेता येतो. तसेच पाणीपुरी, चाट, समोसा आणि पाव-भाजी या लोकप्रिय पदार्थांना तेथे स्थानिक लोकांकडूनदेखील मोठी मागणी आहे. न्यूयॉर्कमध्ये एक भारतीय शाकाहारी रेस्टॉरंट चेन सरवन भवन दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. तेथे इडली आणि डोसापासून भारतीय थाळीदेखील मिळते. जर मांसाहारी खाण्याचे शौकीन असलात तर मोती महलच्या डिलक्समध्ये मुघलाई पदार्थांची चव चाखता येते.
फैलावणारा व्यवसाय
अमेरिकेत भारतीय खाद्यपदार्थांचा व्यवसाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. परंतु, यानंतरदेखील तेथे विदेशी खाद्यपदार्थांच्या बाजारात हिस्सेदारी अजूनही कमीच आहे. अमेरिकेत विदेशी खाद्यपदार्थांचा बाजार १२००० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आहे. ज्यात भारतीय पदार्थांची हिस्सेदारी फक्त २५० कोटी रुपयांची आहे. यात मेक्सिकन खाद्यपदार्थांचा दबदबा आहे, ज्याची हिस्सेदारी ९००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. यामुळे अनेक भारतीय कंपन्यादेखील विस्ताराबाबत विचार करत आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19732

Posted by on Jan 16 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, फिचर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, फिचर (2233 of 2459 articles)


=विश्‍व आर्थिक मंच बैठकीसाठी पंतप्रधानांनी केली निवड= नवी दिल्ली, [१४ जानेवारी] - येत्या २१ ते २४ जानेवारीदरम्यान स्वित्झर्लंडमध्ये होणार्‍या विश्‍व ...

×