Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » अमेरिकेने दिला पाकिस्तानला ८० कोटी डॉलर्सचा निधी

अमेरिकेने दिला पाकिस्तानला ८० कोटी डॉलर्सचा निधी

=अमेरिकेने भारताचा पुन्हा केला विश्‍वासघात=
India-US-flagsवॉशिग्टन, [१६ जून] – आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, अमेरिकेसह मित्र देशांना त्रास देऊ नका, असा दहशतवाद्यांना सज्जड दम देणार्‍या अमेरिकेने मात्र भारताचा पुन्हा विश्‍वासघात केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी भारताला विशेष दर्जा देण्यास अमेरिकन सिनेटने नकार दिल्यानंतर त्याच संसदेने पाकिस्तानला ८० कोटी डॉलर्स म्हणजे ५३०० कोटी रुपयांचा निधी देणार्‍या नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन बिलाला मंजुरी दिली आहे. हा निधी पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्याच्या नावावर देण्यात येतो, हे विशेष. या निधीतील ३० कोटी डॉलर्स हे एकट्या हक्कानी नेटवर्कचा सफाया करण्यासाठी देण्यात आले आहेत. या वृत्ताला पाकिस्तानातील वर्तमानपत्र द डॉनने दुजोरा दिला आहे.
अमेरिकन संसदेचा हा निर्णय भारताला विशेष दर्जा देणार्‍या बिलास मंजूर न करण्याच्या दुसर्‍याच दिवशी घेण्यात आला, हे विशेष. अमेरिका आतापर्यंत पाकिस्तान व अफगाणिस्तानला कोलेशन सपोर्ट फंड (सीएसएफ) अंतर्गत दहशतवाद्याविरोधात लढण्यासाठी देत असून २०१३ पासून आतापर्यंत पाकिस्तानला अमेरिकेने ३.१ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे.
मात्र हा निधी देण्याची मुदत यावर्षी ऑक्टोबरमध्ये संपत असून संसदेत मांडण्यात येणार्‍या नवीन बिलात अफगाणिस्तानला वेगळे करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28623

Posted by on Jun 17 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (229 of 2458 articles)


मुंबई, [१६ जून] - येथील रस्ते घोटाळा प्रकरणात अटकेची पहिली मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात जबाबदार असणार्‍या दहा ...

×