Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » अमेरिकेवर अणुहल्ल्याची उत्तर कोरियाची धमकी

अमेरिकेवर अणुहल्ल्याची उत्तर कोरियाची धमकी

north_korea_usa flagसेऊल, [७ मार्च] – अमेरिका आणि दक्षिण कोरियात आज सोमवारपासून वार्षिक संयुक्त लष्करी कवायती सुरू झाल्या असतानाच, अमेरिकेवर तसेच ईशान्य आशियातील अमेरिकन लष्करी तळावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी उत्तर कोरियाने दिली आहे.
दक्षिण कोरियासोबतच्या संयुक्त लष्करी कवायतींकरिता अमेरिकन नौदलाचे काही जहाज आणि मोठ्या प्रमाणात सैनिक दक्षिण कोरियात डेरेदाखल झाले आहेत. दक्षिण कोरियाचेही सुमारे ३० हजार सैनिक या भागात आले आहेत. यामुळे उत्तर कोरिया संतप्त झाला असून, अशा लष्करी कवायतींमुळे आमच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला असल्याचे या देशातील राज्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेतील विविध शहरांवर तसेच ईशान्य आशियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर अणुबॉम्ब टाकण्याचा आमचा पर्याय मोकळा आहे. अमेरिकेला बेचिराख करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने मात्र उत्तर कोरियाच्या धमकीला विशेष महत्त्व दिले नाही. या देशाने यापूर्वीही आम्हाला अशाच प्रकारची धमकी दिलेली आहे. आम्ही आपले काम करीतच राहणार आहोत. आमच्या कवायती कोणत्याही देशाला धोका पोहोचविण्यासाठी नसून, द्विपक्षीय सहकार्याचा एक भाग आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27087

Posted by on Mar 7 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (748 of 2458 articles)


आत्मविश्‍वास जागृत करीत देशाच्या विकासात योगदान द्यावे : पंतप्रधान महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप नवी दिल्ली, [६ मार्च] - ...

×