Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » ‘अयोध्येत राममंदिर होणारच’

‘अयोध्येत राममंदिर होणारच’

=सपा खासदाराच्या विधानामुळे खळबळ=
Choudhary munawwer saleemलखनौ, [८ जानेवारी] – कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत राममंदिर होणारच! कोणीही मंदिराची निर्मिती रोखू शकत नाही’, अशी घोषणा उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील खासदार चौधरी मुनव्वर सलीम यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पक्षधोरणाविरोधी सूर लावत,‘कोई माई का लाल राम मंदिर बनाने से नहीं रोक सकता’, असे वक्तव्य सलीम यांनी केल्याने उत्तरप्रदेशात सर्वांचेच कान टवकारले आहेत. ‘मलेशियासारख्या मुस्लिम देशातही राम मंदिर आहे. त्यामुळे भारतात तर कुठेही राम मंदिर उभारता येऊ शकते’, अशी भूमिका सलीम यांनी पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जाहीरपणे मांडली आहे. ‘देशात सर्वात आधी रामराज्याचा स्वीकार समाजवादी पक्षानेच केला. सपा हा एकमेव पक्ष भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या आदर्शावर चालणारा आहे’, असेही चौधरी सलीम यांनी म्हटले आहे.
राम मंदिराच्या मुद्यावर समाजवादी पार्टीने सातत्याने टीका केली आहे. असे असताना, चौधरी मुनव्वर सलीम यांनी राम मंदिराचे समर्थन केल्याने सपामध्ये खळबळ उडाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19514

Posted by on Jan 9 2015. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2269 of 2452 articles)


=आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची स्पष्टोक्ती= नाशिक, [८ जानेवारी] - धनगर समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु, आदिवासींसाठी ...

×