Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » अरुणसिंह भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत

अरुणसिंह भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत

Arun-Kumar-Singhनवी दिल्ली, [१ मार्च] – सध्या भारताचे फ्रान्समधील राजदूत असलेले अरुणसिंह यांची अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसंबंधीचे दस्तावेज भारताकडून अमेरिकेला पाठविण्यात आली असून, भारत सरकार अमेरिकेच्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे. १९७९ च्या तुकडीचे आयएफएस अधिकारी असलेले अरुणसिंह यांची नियुक्ती एस. जयशंकर यांच्या जागी करण्यात आली आहे.
जयशंकर यांची यावर्षी २८ जानेवारी रोजी परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. बाहरीनमध्ये भारताचे राजदूत असलेले मोहनकुमार हे आता अरुणसिंह यांची जागा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एप्रिल महिन्यात पॅरिसला भेट देणार आहेत. पॅरिसला जाताना आणि येताना ते जर्मनीलादेखील भेट देतील. याचवेळी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी ते कॅनडाला जाणार आहेत. पंतप्रधानांच्या या भेटीनंतरच हे नवे बदल अस्तित्वात येतील, असे सांगण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान विषयक विभागाचे संयुक्त प्रभारी सचिव म्हणून अरुणसिंह यांनी काम बघितले आहे. जपान, इस्रायल आणि इतर देशातही ते नियुक्तीवर होते. पाच वर्षे वॉशिंग्टन येथे ते उच्चायोगाचे उपप्रमुख होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21008

Posted by on Mar 2 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1993 of 2453 articles)


काळा पैसा दडवणार्‍यांना होणार १० वर्षांची शिक्षा विकासोन्मुख अर्थसंकल्प सादर कंपनी कर कमी करणार धनाढ्यांवर लागणार दोन टक्के अधिभार ...

×