Home » ठळक बातम्या, राज्य » अरुणाचलबाबत आमची भूमिका खरी ठरली

अरुणाचलबाबत आमची भूमिका खरी ठरली

=भाजपाचा दावा=
Shrikant Sharma bjpनवी दिल्ली, [१७ जुलै] – सर्वोच्च न्यायालयाने नबाम तुकी यांचे सरकार बहाल करण्याचा आदेश दिला असतानाही, तुकी यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे तुकी यांच्याकडे बहुमत नाही, हा आमचा दावा खरा होता, हे सिद्ध झाले आहे. इतकेच नव्हे तर, राज्यातील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर तिथे राष्ट्रपती राजवटीचा तत्कालीन राज्यपाल जे. पी. राजखोवा यांचा निर्णयही योग्यच होता, हे देखील स्पष्ट झाले आहे, अशी भूमिका भाजपाने विशद केली.
कॉंगे्रसमध्ये बंडखोरी उफाळली त्याचवेळी आम्ही तुकी सरकार बहुमतात नसल्याचा दावा वारंवार केला होता. सर्वोच्च न्यायालयाने तुकी यांना सरकार स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतरही त्यांना राजीनामा देणे भाग पडले. गेल्या तीन दिवसांच्या काळात अरुणाचलात घडलेल्या घडामोडी बर्‍याच बोलक्या आहेत, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यापूर्वीच्या उत्तराखंडमधील अशाच स्थितीवर आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की, एकसारख्याच समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने दोन पर्याय सुचविले होते. उत्तराखंडमध्ये न्यायालयाने हरीश रावत यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते, तर अरुणाचयात नबाम तुकी यांचे सरकार बहाल करण्याचे आदेश होते. न्यायालयाने तुकी यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले असते, तर आजचे चित्र वेगळे असते. यामुळेच न्यायालयाचा निर्णय फारच विलक्षण असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29129

Posted by on Jul 18 2016. Filed under ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राज्य (144 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१७ जुलै] - मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आपल्या ट्विटर अकाऊंटचा ...

×