Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » अरुण जेटली आशियातील सर्वोत्तम अर्थमंत्री

अरुण जेटली आशियातील सर्वोत्तम अर्थमंत्री

  • लंडनच्या पाक्षिकाने केली निवड
  • अर्थव्यवस्था बळकट करण्याचे श्रेय मोदींना

arun-jaitley-important-BJP-Modiनवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] – लंडनमधील एका पाक्षिकाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची आशियातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून निवड केली आहे. ‘फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर’ हा आशियातील अतिशय मानाचा पुरस्कार अरुण जेटली यांना जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले असल्याचा आरोप करणार्‍या कॉंगे्रस आणि इतर विरोधी पक्षांसाठी ही सणसणीत चपराकच ठरली आहे.
गेल्या १० वर्षांच्या काळात भारतात जो आर्थिक विकास होऊ शकला नाही, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अवघ्या १८ महिन्यांत शक्य करून दाखविला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामांचा धडाका आणि अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांनी घेतलेले धडक निर्णय आणि दिलेले योगदान यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था आज इतकी मजबूत झाली आहे. आर्थिक व्यवस्थापनाच्या आघाडीवर जेटली यांची कामगिरी खरोखरच मोलाची ठरली आहे. त्यांनी असे ठोस निर्णय घेतले नसते, तर भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली नसती, असे या मासिकातील एका लेखात म्हटले आहे.
अरुण जेटली यांची कामगिरी अतिशय उत्तम आहेच, पण नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकास कामांचा धडाका, त्यांची दूरदृष्टी आणि विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे त्यांचे कसब यामुळेच हे सर्व शक्य झाल्याने भारताच्या आर्थिक विकासाचे सर्वाधिक श्रेय मोदी यांनाच द्यावे लागणार आहे, असेही पाक्षिकाने स्पष्ट केले.
गेल्या वर्षी याच पाक्षिकाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आशियातील मध्यवर्ती बँकांचे ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. तर, २०१० मध्ये पाक्षिकाने विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही आशियातील सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून घोषित करताना, ‘फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25137

Posted by on Oct 15 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1337 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१५ ऑक्टोबर] - विशाखापट्‌टणम येथे बंगालच्या उपसागरात फेबु्रवारीमध्ये यंदाचे आंतररा ष्ट्रीय नौदल संचलन होणार आहे. ४ ते ८ ...

×