Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » अर्थसंकल्पात आकड्यांची हेराफेरी

अर्थसंकल्पात आकड्यांची हेराफेरी

=शेतकर्‍यांच्या तोंडाला पुसली पाने=
SHARAD PAWARनवी दिल्ली, [१ मार्च] – अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातून आकड्यांची हेराफेरी करीत शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंगळवारी एका पत्रपरिषदेत केला.
बिश्‍वंभरदास मार्गावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत शरद पवार म्हणाले की, कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी क्षेत्रासाठीची तरतूद २० हजार कोटींचीच आहे. आतापर्यंत कर्जापोटी बँकिग क्षेत्रासाठी करण्यात येणारी १५ हजार कोटींची तरतूद यावेळी बँकिंग क्षेत्रातून काढत कृषी क्षेत्रात टाकण्यात आली.
आपण शेतकर्‍यांचे हितैशी असल्याचा आव हे सरकार आणत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कृषी उत्पादनाच्या किमान हमी भावात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. सेवा करात केलेल्या वाढीमुळे महागाई वाढणार असून, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे, असा आरोप पवार यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्य समितीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत पारित करण्यात आलेल्या ठरावांची माहिती देताना पवार म्हणाले की, मानव संसाधन राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांनी आग्रा येथे केलेल्या प्रक्षोभक विधानाचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. कठेरिया यांच्या विधानामुळे हिंदू मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्ठी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले.
विद्यमान सरकारच्या ध्येयधोरणाशी सहमत नसलेल्यांसाठी सध्या वाईट दिवस आले आहेत, असे पवार एका प्रश्‍नावर म्हणाले. केरळमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस डाव्या पक्षांशी युती करणार आहे. यासंदर्भात आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट करीत पवार म्हणाले की, पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांशी युती करावी, अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानुसार तशी चर्चा सुरू आहे. आसाममध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही जागा गेल्या काही निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी कोणाशीही युती न करता या जागा स्वबळावर लढण्याची घोषणा पवार यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26979

Posted by on Mar 2 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (785 of 2453 articles)


=पीक वीमा योजना सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा : पंतप्रधान= नवी दिल्ली, [१ मार्च] - पीक विमा योजना शेतकर्‍यांच्या फायद्याची आहे. या ...

×