Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गुरुवारी बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गुरुवारी बैठक

sansad top three lionsनवी दिल्ली, [३० जानेवारी] – संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा निश्‍चित करण्यासाठी येत्या गुरुवार ४ फेबु्रवारी रोजी संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीची बैठक बोलावण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वसाधारणपणे फेबु्रवारीच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात बोलावले जाते. मागील दोन्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या प्रचंड गोंधळामुळे वाया गेल्याने, जीएसटी आणि रिअल इस्टेट यासारखी महत्त्वाची विधेयके पारित करण्यासाठी सरकार यावर्षी हे अधिवेशन आणखी लवकर बोलावण्याची शक्यता असल्याचे संकेत या घडामोडीशी संबंधित सूत्राने दिले आहेत.
आम्ही गुरुवार, ४ फेबु्रवारी रोजी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख त्यात ठरविण्यात येईल आणि तशी शिफारस राष्ट्रपतींकडे पाठविली जाईल. सरकारसाठी हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचे आहे. कारण, या अधिवेशनात राज्यसभेत रखडलेले जीएसटी विधेयक पारित करायचे आहे. यासाठी कॉंगे्रसचे सहकार्य प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26672

Posted by on Jan 31 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (867 of 2453 articles)


=डोनॉल्ड ट्रम्प यांची स्तुतिसुमने= वॉशिंग्टन, [२७ जानेवारी] - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनॉल्ड ट्रम्प यांनी प्रथमच ...

×