Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » अर्थसंकल्पीय भाषणाने जेटली यांनी लोकसभा जिंकली

अर्थसंकल्पीय भाषणाने जेटली यांनी लोकसभा जिंकली

arun jaitley budget 2016 loksabhaनवी दिल्ली, [२९ फेब्रुवारी] – ‘फिर भी दिखाया है हमने, फिर भी दिखा देंगे सबको, की ऐसे हालात में भी आता है दरिया पार करना’, अशा शेरोशायरीने आणि पूर्ण आत्मविश्‍वासाने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी आपला तिसरा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.
जवळपास शंभर मिनिटांच्या भाषणात अरुण जेटली यांनी अनेक वेळा टाळ्या घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनेकवेळा बाक थपथपवल्यापासून राहावले नाही. त्यामुळे जेटली यांचे भाषण संपताच आपल्या जागेवरून उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन केले. कृषी, शेतकरी, महिला आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी जेटली यांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही जेटली यांचे अभिनंदन केले. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपा खासदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल जेटली यांचे अभिनंदन केले.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणाची सुरुवात उभे राहून केली. त्यांची प्रकृती स्वस्थ नसमुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी त्यांना बसून अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याची अनुमती दिली. जेवढे शक्य आहे, तेवढे भाषण मी उभा होऊन वाचतो, असे जेटली म्हणाले. काही वेळ उभे होऊन भाषण वाचल्यानंतर जेटली यांनी बसून भाषण वाचण्याची अनुमती सुमित्रा महाजन यांच्याकडे मागितली आणि उर्वरित भाषण बसून वाचले. भाषणाचा शेवट मात्र त्यांनी उभे होत केला. विशेष म्हणजे, मागील वर्षीही जेटली यांनी बसूनच अर्थसंकल्पाचे भाषण वाचले होते.
अरुण जेटली यांच्या एका बाजूला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी बसले होते, तर दुसर्‍या बाजूला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी होते. अर्थमंत्री जेटली यांच्या पत्नी संगीता आणि मुलगी सोनिया यावेळी अध्यक्षांच्या गॅलरीत उपस्थित होत्या.
संपूर्ण जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असताना आज मी अर्थसंकल्प सादर करीत आहे, याकडे लक्ष वेधत जेटली यांनी संपुआ सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, आम्ही सत्तेवर आलो तेव्हा महागाई प्रचंड वाढली होती. विदेशी गुंतवणूक आणि निर्यात कमी झाली होती. अशी प्रतिकूल परिस्थिती वारशात आम्हाला मिळाली होती.
लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी येण्यापूर्वी जेटली यांनी आज सकाळी १० च्या सुमारास झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाची माहिती दिली. तोपर्यंत अर्थसंकल्प कसा आहे, त्यात काय आहे, याबाबत मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी अनभिज्ञ होते. जेटली अर्थसंकल्प सादर करीत असताना कॉगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यावेळी लोकसभेत उपस्थित होतेे. ब्रेल पेपरवर करसवलत देण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली होती, ती जेटली यांनी स्वीकारली आणि तसा उल्लेख राहुल गांधी यांचे नाव घेत आपल्या भाषणात केला. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यांसाठी असलेली गॅलरीही यावेळी भरली होती. अजय संचेती, रामदास आठवले यांच्यासह अनेक राज्यसभा सदस्य यावेळी गॅलरीत उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26968

Posted by on Mar 1 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (789 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२९ फेब्रुवारी] - सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातून ...

×