Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » अर्थसंकल्प २०१६-१७ : प्रतिक्रिया

अर्थसंकल्प २०१६-१७ : प्रतिक्रिया

arun jaitley budget 2016‘‘या अर्थसंकल्पात प्रत्येकासाठी काहीतरी आहे. अर्थमंत्री या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. श्रीमंतांच्या ऐवजी सामान्यांना हा अर्थसंकल्प सहाय्यभूत ठरणार आहे.’’
– यशवंत सिन्हा, भाजपा
…..
‘‘स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी आणि गरिबांसाठी अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचणार आहेत.’’
-राधामोहन सिंग, केंद्रीय कृषिमंत्री
…..
‘‘सरकारने एक सर्वसाधारण अर्थसंकल्प तयार केला आहे. त्यात संपुआ सरकारच्या अर्थसंकल्पातील काही तरतुदी जशाच्या तशा उचलण्यात आल्या आहेत.’’
-शशी थरूर, कॉंग्रेस
…..
‘‘देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.’’

-अमित शाह, भाजपाध्यक्ष
…..
‘हा अर्थसंकल्प शेतकर्‍यांना डोळ्यांसमोर ठेवून आखण्यात आल्याचा मला आनंद झाला आहे. २०२२ मध्ये देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.’’
– शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश
…..
‘‘२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. याची हमी कोण घेणार? एकूणच हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.’’
-लालूप्रसाद यादव, राजदप्रमुख
…..

‘‘दिल्लीवरील आर्थिक अन्यायाचे सत्र या सरकारनेही कायम ठेवले आहे. केंद्रीय करप्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकूणच हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.’’
-मनिष सिसोदिया, उपमुख्यमंत्री, दिल्ली
…..
‘‘जे करायला हवे होते, ते सरकारने केलेले नाही. रोजगार निर्मिती किंवा सामान्यांना दिलासा देणारी कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात नाही.’’
-कमल नाथ, कॉंग्रेस
…..
‘या अर्थसंकल्पात अनेक त्रुटी आहेत. त्यात काहीच नवीन नाही. जुने धोरण नव्या शब्दात मांडले आहे.’’
– मनिष तिवारी, कॉंग्रेस
……
‘‘अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींच्या माध्यमातून सरकारने विकासकामातील अडथळे दूर केले. यामुळे सर्वसामान्यांसाठी संधींची नवी कवाडं खुली होणार आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळणार आहे.’’
-किरण बेदी, भाजपा नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या

Short URL: https://vrittabharati.in/?p=26971

Posted by on Mar 1 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (788 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२९ फेब्रुवारी] - ‘फिर भी दिखाया है हमने, फिर भी दिखा देंगे सबको, की ऐसे हालात में भी ...

×