Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » अर्ध्या टक्क्याने कर्ज स्वस्त होणार

अर्ध्या टक्क्याने कर्ज स्वस्त होणार

=घर व कार घेणार्‍यांसाठी खुशखबर!=
RBI GATEनवी दिल्ली, [३ एप्रिल] – घाऊक व किरकोळ महागाई पूर्णपणे नियंत्रणात असल्याने केंद्र सरकारनेही आर्थिक शिस्तीसाठी कठोर पावले उचलल्याने भारतीय रिझर्व्ह बँक येत्या मंगळवारी नव्या वर्षातील आपल्या पतधोरणाचा द्विमासिक आढावा घेताना प्रमुख कर्जांवरील व्याजदरात किमान अर्ध्या टक्क्याने म्हणजेच ०.५० टक्क्याने कपात करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारने याआधीच अल्प बचतींवरील व्याजाचे दर १.३ टक्क्यांनी कमी केले आहेत. १ एप्रिलपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यातच देशाला आर्थिक प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी अर्थमंत्रालयानेही कर्जांवरील व्याजदरात कपात करण्याची शिफारस रिझर्व्ह बँकेला केली आहे. नव्या वर्षातील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक आर्थिक विकासाला अनुसरून निर्णय घेईल, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही गेल्या आठवड्यात व्यक्त केली होती.
किरकोळ महागाईचा दर उण्यावर आणि घाऊक महागाईचा दर पाच टक्क्यांवर असताना प्रमुख कर्जांवरील व्याजाचा जास्त दर आर्थिक विकासाला खिळ घालू शकतो, असे मत बँकांनीही व्यक्त केले आहे. आरबीआय मंगळवारी व्याजदरात किमान ०.२५ टक्क्यांची कपात करेल, अशी अपेक्षा काही बँकर्सने व्यक्त केली असली, तरी महागाईचा विद्यमान दर लक्षात घेता, व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात जाहीर केली जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील महनॉट यांनीही वृत्तसंस्थेशी बोलताना व्याजदरात ०.२५ ते ०.५० टक्क्यांनी व्याजदर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27693

Posted by on Apr 4 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (533 of 2453 articles)


=८ रोजी समारंभ= बरेली, [३ एप्रिल] - येथील दरगाह शाह शराफतच्या शाह सकलेन अकादमीतर्फे १०१ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित ...

×