अर्ध्या तासात माहिती द्या, अन्यथा कारवाई
Monday, March 23rd, 2015=नोंदणीकृत कंपन्यांना सेबीचा निर्वाणीचा इशारा=
नवी दिल्ली, [२२ मार्च] – नोंदणीकृत कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयांची अवघ्या ३० मिनिटात आणि बैठकीतील अन्य विषयांची माहिती चोवीस तासांच्या आत सार्वजनिक करावी, असे स्पष्ट करीत, आदेशाचे पालन न करणार्या कंपन्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा सेबीने आज रविवारी दिला आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीतील माहिती उघड करण्यासाठी आम्ही जो कालावधी निर्धारित केला आहे, त्याचे काटेकोरपणे पालन केले जावे. या निर्णयांचा आणि बैठकीतील अन्य माहितीमुळे गुंतवणूकदारांचाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे शेअर बाजाराच्या माध्यमातून ही माहिती बाहेर यायलाच हवी. अनेकदा अफवा आणि प्रसारमाध्यमांच्या बातम्यांबाबत प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांनाही कंपन्यांनी उत्तर देणे बंधनकारक आहे, असे सेबीने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
बैठक संपल्यानंतर अर्ध्या तासात तसेच त्यानंतरच्या चोवीस तासात कोणकोणती माहिती जाहीर करण्यात यावी, त्याबाबतचे सविस्तर पत्रक सेबीकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे. अलीकडील काळात अनेक भारतीय कंपन्या प्रसारमाध्यमांमार्फत विशिष्ट माहितीच बाहेर आणत असतात. अशा प्रकारची माहिती आधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करणे आवश्यक असतानाही या कंपन्या गुंतवणूकदारांना अंधारात ठेवतात. कंपनी आणि प्रवतर्काचा आर्थिक फायदा करणे हाच यामागील एकमेव उद्देश असतो. शेअर बाजाराच्या माध्यमातून सर्व उपयुक्त माहिती जाहीर करण्यासोबतच कंपन्यांनी आपल्या अधिकृत सांकेतिक स्थळांवरही ती उपलब्ध करून द्यायलाच हवी, असेही सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=21671

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!