Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अल्पसंख्यकांचा विकास हेच मोदींचे ध्येय

अल्पसंख्यकांचा विकास हेच मोदींचे ध्येय

=नजमा हेपतुल्ला यांची भूमिका=
najma_heptullahपाटणा, [९ ऑगस्ट] – या देशात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक समाजाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळजी आहे. मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने केंद्रात सत्तेवर आल्यापासून इतरांसोबतच अल्पसंख्यक समाजातील लोकांच्याही सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी शनिवारी सायंकाळी येथे केले.
पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात नजमा हेपतुल्ला यांनी अल्पसंख्यक समाजासाठी केंद्र सरकारच्या ‘नई मंझिल’ या नव्या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला.
पंतप्रधान इफ्तार पार्टीला जात नाही, टोपीचा स्वीकार करीत नाही, अशी चर्चा केली जाते. हा सर्व प्रकार इतका आवश्यक नसतो. भाजपाप्रणीत रालोआ सरकारचा विश्‍वास केवळ विकासावरच आहे. समाजातील कोणताही घटक विकासाच्या प्रवाहापासून दूर राहायला नको, हाच या सरकारचा निर्धार आहे. अल्पसंख्यकांचा मागासलेपणा दूर करून त्यांना आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मजबूत करण्यावर सरकार गेल्या सव्वा वषार्र्पासून सातत्याने भर देत आहे. इफ्तार पार्ट्यांचे आयोजन श्रीमंतांकडून केले जाते. छायाचित्र काढण्याशिवाय तिथे दुसरे काहीच होत नाही. गरिबांच्या वस्त्यांमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याचे मला तरी आठवत नाही, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23613

Posted by on Aug 10 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1524 of 2453 articles)


=सूचना व प्रसारण मंत्रालयाची तीन वाहिन्यांना नोटीस= नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] - १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील एक सूत्रधार याकुब ...

×