Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » अल्पावधीत जाहीर करा काळा पैसा, अटक टाळा

अल्पावधीत जाहीर करा काळा पैसा, अटक टाळा

=सरकार देणार अखेरची संधी, अन्यथा दहा वर्षांचा कारावास, ३०० टक्के दंड=
swissaccountsनवी दिल्ली, [१८ मार्च] – देशविदेशात काळा पैसा जमा करणार्‍यांना कठोर शिक्षेपासून स्वत:चा बचाव करता यावा यासाठी सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सादर केली आहे. ज्यांचा देश-विदेशात काळा पैसा आहे, त्यांनी याविषयीची माहिती काही महिन्यांच्या आत सरकारकडे सादर करावी. असे करणार्‍यांना माफी दिली जाईल. कारागृहात जाण्यापासून तो स्वत:ला वाचवू शकेल, अशी ही योजना आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत बेनामी विदेशी उत्पन्न आणि संपत्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच हे विधेयक सादर केले जाणार आहे. देश-विदेशातील काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी विशेष तरतूद या विधेयकात आहे.
देश-विदेशातील आपल्या काळ्या पैशाची माहिती लपवून ठेवणार्‍यांना आम्ही ही शेवटची संधी देत आहोत. येत्या काही महिन्यातच त्यांनी स्वेच्छेने याबाबतची माहिती सरकारला सादर करावी. योजनेची मुदत संपल्यानंतर काळा पैसा दडविणार्‍यांना प्रस्तावित कायद्यानुसार किमान १० वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. याशिवाय ज्याच्याकडे जितका काळा पैसा सापडेल, त्याला त्याच्या ३०० टक्के दंड करण्याची शिफारसही कायद्यात करण्यात आली आहे.
विदेशात काळा पैसा लपविणार्‍या अनेकांची नावे सरकारकडे आली आहेत. ती लवकरच जाहीर केली जातील, असे संकेतही केंद्र सरकारने दिले आहेत. याबाबत कायदा करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच बोलून दाखविला होता. सरकार सत्तेत आल्यावर पहिल्याच बैठकीत काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी सरकारने विशेष तपास पथकही स्थापन केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21585

Posted by on Mar 19 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1877 of 2453 articles)


=कर नियमांचे उल्लंघन, गृहमंत्रालयाची कारवाई= नवी दिल्ली, [१८ मार्च] - वार्षिक आयकर विवरण सादर न करता करविषयक नियमांचे उल्लंघन करून ...

×