Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » असहिष्णुतेचा वाद सुपीक डोक्याची निर्मिती

असहिष्णुतेचा वाद सुपीक डोक्याची निर्मिती

=देशाला बदनाम करण्यासाठी प्रचंड पैसा मोजला: व्ही. के. सिंह यांची स्पष्ट भूमिका=
VK-Singh_4लॉस एन्जेलिस, [१६ नोव्हेंबर] – भारतात सध्या असहिष्णुतेवर जी चर्चा सुरू आहे, ती अनावश्यक आहे. देशात कुठेही असहिष्णुता नसतानाही, काही सुपीक डोक्यांमधून भरपूर पैसे मोजून झालेली ती एक निर्मिती आहे. केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार आणि भारताला जगात बदनाम करण्याचा हा एक व्यापक कट आहे, अशी स्पष्ट भूमिका परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आज सोमवारी येथे विशद केली.
मुळातच भारतात कुठेही असहिष्णुता नसल्याने, त्यावरील चर्चादेखील अनावश्यक आहे. भाजपा सरकार सत्तेवर आल्याने अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यांनी काही सुपीक डोके असणार्‍यांना भरपूर पैसा मोजला आणि भारतात असहिष्णुता असल्याचे चित्र रेखाटले. बिहारमध्ये भाजपा सत्तेवर येत असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजपाला कसेही करून रोखण्यासाठी राजकीय हेतूने हा वाद निर्माण करण्यात आला होता, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
प्रादेशिक प्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते पत्रकारांशी बोलत होते. पॅरिस हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिका दौरा रद्द केला आणि दुबईहूनच भारतात परत आल्या. त्यामुळे त्यांच्याऐवजी व्ही. के. सिंह यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
भारतीय प्रसारमाध्यमे कशी काम करतात, यावर मला भाष्य करायचे नाही. भारतात असहिष्णुतेबद्दल काय मजेशीर बोलले जाते, ते मी तुम्हाला सांगतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात चर्चवर हल्ले सुरू आहेत, अशी ओरड करून भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले आणि ख्रिश्‍चन समाजाला भाजपापासून दूर नेण्यात आले होते. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात, ज्या घटनांशी भाजपा किंवा केंद्र सरकारचा कुठलाही संबंध नव्हता, त्या घटनांसाठी भाजपा आणि सरकारला बदनाम करण्यात आले. भाजपामुळे देशात असहिष्णुतेची स्थिती निर्माण झाली, असे चित्रच रेखाटण्यात आले होते, याकडे सिंह यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25500

Posted by on Nov 17 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1232 of 2458 articles)


=लेखक, साहित्यिक, बुद्धिवंतांना राष्ट्रपतींच्या कानपिचक्या= नवी दिल्ली, [१६ नोव्हेंबर] - भावनेच्या भरात वाहून न जाता चर्चेच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर तोडगा ...

×