Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » असाउद्दिन ओवैसीविरोधात याचिका

असाउद्दिन ओवैसीविरोधात याचिका

Hyderabad MP Asaduddin Owaisiलखनौ, [१५ मार्च] – मानेवर सुरा ठेवला तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे नेते असाउद्दिन ओवैसी यांच्याविरोधात लखनौ येथील न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
ओवैसी यांनी भारत मातेचा अपमान केला असल्याने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. संतोष पांडे असे नाव असलेल्या वकिलाने ही याचिका दाखल केली. भारत मातेचा अपमान हा देशद्रोह असल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. तर, न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्‍वास असून, मला नक्कीच न्याय मिळेल, असे सांगताना ओवैसी यांनी ‘जय हिंद’ म्हटले.
दरम्यान, कॉंगे्रसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी जाहीरपणे भारत माता की जय बोलणे मुळीच आवश्यक नाही आणि यासाठी कुणी बळजबरीही करायला नको, असे मत व्यक्त केले आहे.
देश सोडून जा : विजयवर्गीय
भारतात राहून ज्यांना भारत माता की जय म्हणायचे नसेल, त्यांना भारतात राहण्याचा मुळीच अधिकार नाही. अशा लोकांनी तत्काळ देश सोडून जायला हवे, असे स्पष्ट मत भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27343

Posted by on Mar 16 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (651 of 2452 articles)


=चिदम्बरम् यांची कबुली= मुंबई, [१५ मार्च] - लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब असलेली इशरत जहॉंबाबत गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या शपथपत्रात आपण काही ...

×