Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे पाकिस्तानच

आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे पाकिस्तानच

=न्यूयॉर्क टाईम्सचे खळबळजनक वृत्त=
new-york-times-hedन्यूयॉर्क, [७ फेब्रुवारी] – आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे केवळ पाकिस्तानच असून, या देशाची शक्तिशाली गुप्तचर संस्था आयएसआय या सर्व जिहादींचे व्यवस्थापक म्हणून काम करीत असते. इसिससारख्या जहाल दहशतवादी संघटनेला मोठे करण्यातही आयएसआयचाच हात असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, असे खळबळजनक वृत्त अमेरिकेतील आघाडीच्या न्यूयॉर्क टाईम्स दैनिकाने आज रविवारच्या अंकात प्रकाशित केले आहे.
भारतासह विविध देशांमधील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यात पाकी आयएसआयचा सहभाग सिद्ध करणारे स्टिंग ऑपरेशन या दैनिकाने केले आहे, हे विशेष!
अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेक्यांनाही पाकचेच समर्थन असल्याचे सिद्ध करणारे अनेक ठोस पुरावे तज्ज्ञांच्या हातात लागले आहेत. इतकेच नव्हे, तर विदेशी भूमीतही ज्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत, त्यातील बहुतांश घटनांमध्ये पाकचाच हात असल्याचे दिसून आले आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
पाकची आयएसआय ही गुप्तचर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील जिहादींचे व्यवस्थापक म्हणून काम करीत आली आहे. या जिहादींमध्ये बहुतांश सुन्नी कट्टरतावाद्यांचा समावेश आहे. सध्या इराक आणि सीरियासह काही देशांमध्ये प्रचंड हिंसाचार करीत असलेल्या इसिसलाही आयएसआयनेच मोठे केले असल्याचा तर्क अनेक जागतिक तज्ज्ञांनी काढला आहे. तालिबान आणि अल् कायदाला आमचा पाठिंबा नाही आणि आम्ही स्वत:च अशा संघटनांच्या दहशतवादाचा शिकार ठरत आहोत, असा कांगावा पाकमधील राज्यकर्त्यांकडून सातत्याने केला जात असला, तरी पाकने आपल्या देशात आणि विदेशी भूमीत राष्ट्रवादी चळवळ म्हणून याच शक्तींना कशा प्रकारे पाठबळ दिले, याचे तज्ज्ञांनी विश्‍लेषण केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये भारताचा प्रभाव वाढत असल्याने तो कमी करण्यासाठी पाकिस्तान तालिबान्यांना हाताशी घेत आहे. अफगाण सुन्नी इस्लामिस्ट प्रदेश राहावा, हाच पाकचा यामागील हेतू आहे. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही पाक विविध जिहादी गटांचा अशाच प्रकारे वापर करीत आहे, असेही वृत्तात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26766

Posted by on Feb 8 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (854 of 2458 articles)


प्रणव मुखर्जींनी केले अवलोकन युद्धनौका संचलन थाटात पंतप्रधानांचीही विशेष उपस्थिती विशाखापट्टणम्, [६ फेब्रुवारी] - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी ...

×