Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » आंतरराष्ट्रीय शांततेला इसिसचा गंभीर धोका: संयुक्त राष्ट्र

आंतरराष्ट्रीय शांततेला इसिसचा गंभीर धोका: संयुक्त राष्ट्र

=फ्रान्सच्या प्रस्तावाला मंजुरी=
UNO united-nations-buildingन्यूयॉर्क, [२१ नोव्हेंबर] – जगभरात प्रचंड हिंसाचार करून क्रूरतेचा कळस गाठत असलेल्या इसिस या जहाल दहशतवादी गटासोबतच, अन्य अतिरेकी गटांचाही पूर्णपणे पाडाव करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र यावे, अशा आशयाचा महत्त्वाचा ठराव संयुक्त राष्ट्रसंघात शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला. इसिस या दहशतवादी संघटनेकडून आंतरराष्ट्रीय शांततेला गंभीर धोका असल्याचेही संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे.
पॅरिस हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सचे हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडला होता. पॅरिस आणि आफ्रिकेतील माली येथील हल्ल्याच्या अनुषंगाने संपूर्ण जग आता दहशतवादाविरोधात एकत्र आले आहे, हेच या ठरावातून दाखवून देण्यात आले आहे. इसिस आणि अन्य अतिरेकी गटांपासून निर्माण झालेल्या धोक्यापासून जगाला वाचविण्याकरिता सर्व माध्यमांचा अवलंब करण्यात यावा, असे या ठरावात नमूद केले आहे.
सुरक्षा परिषदेने दहशतवादाविषयी १९९९ पासून संमती दिलेल्यांपैकी हा १४ वा ठराव आहे. गेल्या आठवड्यात इसिसच्या दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये केलेल्या शक्तिशाली हल्ल्यात १३२ लोक मृत्यूमुखी पडले होते. त्याच्या आठ दिवस आधी बैरूतमध्येही दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये ४३ लोक ठार झाले होते. तर, त्याआधी इसिसने रशियन विमानावर क्षेपणास्त्र डागून ते पाडले होते. यात २२४ लोकांचा मृत्यू झाला होता. विविध देशांमध्ये सातत्याने घडत असलेल्या दहतशवादाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा परिषदेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25635

Posted by on Nov 22 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1191 of 2458 articles)


=भारत-चीनचा महत्त्वपूर्ण निर्णय: राजनाथसिंह यांच्या भेटीचे फलित= बीजिंग, [२१ नोव्हेंबर] - द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य वाढविण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलताना भारत ...

×