Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » आंतरराष्ट्रीय सीमेला आणखी एका सुरक्षकवच

आंतरराष्ट्रीय सीमेला आणखी एका सुरक्षकवच

=केंद्र सरकारची योजना=
india-pakistan borderजम्मू, [१९ एप्रिल] – जम्मू-काश्मिरातील २०२ किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेला सुरक्षेचे आणखी एक कवच पुरविण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. सांबा भागातून पाकिस्तानचे अतिरेकी भारतात घुसखोरी करून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करतात. यावर आळा घालण्यासाठीच या सीमेवर दुसरे सुरक्षा कवच देण्यात येत आहे.
सांबा भागातील पोलिस ठाण्यावर आणि लष्करी छावणीवर गेल्या महिन्यात अतिरेक्यांनी धाडसी हल्ले केले आहेत. यात काही जवान आणि पोलिसांना जीव गमवावा लागला. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयातील उच्चस्तरीय समितीने सांबापासून अखनूरपर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला. या सीमेवर सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफचे जवान तैनात असले, तरी त्यांना पोलिस किंवा लष्कराचे पाहिजे तसे पाठबळ नाही. बीएसएफ जवानांना सुरक्षेचे दुसरे कवच आवश्यक झाले आहे, असा अहवाल या समितीने केंद्र सरकारला दिला होता.
या भागात लष्कराचा एक तळ असला, तरी तिथे जवानांना केवळ प्रशिक्षण दिले जाते. या तळातील जवानांकडून दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करता येणार नाही. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गही सांबा जिल्ह्यातूनच जात असल्याने धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे या सीमेला सुरक्षेचे दुसरे कवच उपलब्ध करून देणे आवश्यक झाले असल्याचे या समितीने म्हटले आहे.
सांबा जिल्ह्यातील सीमेवरून भारतात घुसखोरी करण्यासाठी अतिरेकी चाप आणि तरन नाल्याच्या मधे असलेल्या भागाचा प्रामुख्याने वापर करतात. याच भागातून अतिरेकी राष्ट्रीय महामार्गावर येतात. येथे आल्यानंतर अतिरेकी वाहनांचे अपहरण करून जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यामुळे बीएसएफला बळकट असे पाठबळ देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने समितीच्या शिफारसी मान्य केल्या असून, या आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला निमलष्करी दल आणि राज्य पोलिस यांचा संयुक्त सहभाग असलेले कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिशेने लवकरच ठोस पावले उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22196

Posted by on Apr 21 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1765 of 2453 articles)


=नरेंद्र मोदींच्या क्षमतेवर रतन टाटांचा विश्‍वास= मुंबई, [१८ एप्रिल] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ज्या चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखविले ...

×