Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आंदोलनाचा फज्जा उडण्याची अण्णांना भीती

आंदोलनाचा फज्जा उडण्याची अण्णांना भीती

=मोदी सरकारविरोधात मुद्देच नाही=
Anna Hazareअहमदनगर, [१५ फेब्रुवारी] – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात कोणताही मुद्दा नसताना केवळ काही जुन्या सहकार्‍यांच्या आग्रहाखातर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची घोषणा तर केली. पण, मोदी सरकारविरोधात एकही ठोस मुद्दा नसल्याने आपल्या या आंदोलनाचा पूर्णपणे फज्जा उडेल, या भीतीने अण्णांना चांगलेच ग्रासले आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर येत्या २४ फेबु्रवारी रोजी आंदोलन करण्याची घोषणा अण्णांनी केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मोदी सरकारवर एकही डाग लागलेला नाही. सरकारी पातळीवरून भ्रष्टाचार तर हद्दपारच झाला आहे. त्यामुळे आंदोलन कोणत्या मुद्यावर करायचे, हा प्रश्‍न अण्णांना सतावत आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारच्या सहकार्याने दिल्लीचा विकास करायचा असल्याने त्यांना मोदी सरकारच्या विरोधात जाऊन अण्णांना साथ देणे परवडणार नाही. त्यामुळे केजरीवाल आणि कंपनीची आपल्याला साथ मिळणार नाही, ही भीतीही अण्णांना वाटत आहे.
संपुआ सरकारच्या काळात अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार निर्मूलन करणार्‍या जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले होते. यात त्यांना प्रचंड यशही मिळाले. देशभरातील शहरी आणि ग्रामीण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. अण्णांनी आता भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीचा विषय हाती घेतला आहे. या मुद्यावर सरकारने आधीच अध्यादेश जारी केला असून, अधिवेशनात केवळ चर्चा होणे बाकी आहे. शिवाय हा मुद्दा देशात सर्वत्र लागू होणार नाही.
मोदी सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात केंद्रातील सत्ता हाती घेतली आहे. या काळातील सरकारच्या कामावर जनता खुश असल्याने ते अण्णांच्या या आंदोलनाला प्रतिसाद देण्याची शक्यता फार कमी आहे. स्वत: अण्णांनाही याची जाणीव झाली आहे. त्यातच अण्णांनी आंदोलनाची कुठलीही रूपरेषा निश्‍चित न करता आणि कोअर समितीचे मतही विचारात न घेता, केवळ काही जुन्या सहकार्‍यांच्या आग्रहाला बळी पडून या आंदोलनाची घोषणा घाईघाईनेच केली आहे. या आंदोलनाबाबत त्यांच्या बहुतांश समर्थकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20591

Posted by on Feb 16 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2063 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] - राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्‍यांना टोल टॅक्सपासून दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने फेब्रुवारीच्या अखेरपयर्र्त देशातील १२५ ...

×