Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आंदोलनात देश पेटविण्याचा अधिकार कुणालाच नाही

आंदोलनात देश पेटविण्याचा अधिकार कुणालाच नाही

=हार्दिक पटेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा संताप, नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करणार=
supreme_court_1नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] – पाटिदार समुदाच्या आरक्षण आंदोलनाच्या काळात प्रचंड जाळपोळ झाली आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. आंदोलन करून देश पेटविण्याचा किंवा सार्वजनिक संपत्ती नष्ट करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा नुकसानीकरिता जबाबदार कोण, हे निश्‍चित करण्यासाठी ठोस निकष ठरविण्यात येतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी स्पष्ट केले.
न्या. जे. एस. खेहार आणि न्या. सी. नागाप्पन यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने आंदोलनांमध्ये होणार्‍या अतोनात नुकसानांवर संताप व्यक्त करतानाच, या मुद्यावर आम्ही आता गंभीरपणे विचार करणार असल्याचे स्पष्ट केले. पाटिदार समाजाकरिता आरक्षणाच्या मागणीसाठी पार्थिव पटेलने देशाच्या अनेक भागांमध्ये हिंसक आंदोलन केले होते. यात कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची हानी झाली होती. त्यातच हार्दिकने पोलिसांना ठार मारण्याची भाषा बोलतानाच, एका आंदोलनात तिरंग्याचाही अपमान केला होता. या प्रकरणी दाखल देशद्रोहाचा खटला मागे घेण्यात यावा, अशी विनंती करणार्‍या त्याच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
आंदोलनाच्या काळात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी सपत्ती नष्ट होण्याकरिता नेमका कोण दोषी आहे, हे ठरविण्यासाठी आम्ही आता ठोस मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहोत. संपत्तीचे नुकसान केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची जाणीव लोकांना व्हायलाच हवी. आंदोलनाच्या काळात कुणीही देशाला वेठीस धरू शकणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
आंदोलन करणारा पक्ष भाजपा असो वा कॉंगे्रस किंवा आणखीही कोणती संघटना असो, सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीच्या नुकसानीकरिता यापुढे तेदेखील जबाबदार धरले जातील, हे त्यांनी लक्षात ठेवायलाच हवे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26859

Posted by on Feb 25 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (822 of 2453 articles)


पंतप्रधान मोदींनी दिला थ्रीडी मंत्र मेक इन इंडिया सप्ताहाचे दिमाखात उद्घाटन पोलंड, फिनलॅण्डच्या पंतप्रधानांची उपस्थिती १२ राज्यांचे मुख्यमंत्रीही हजर ...

×