Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » आगर्‍यात अनेक महिला झाल्या ख्रिश्‍चन

आगर्‍यात अनेक महिला झाल्या ख्रिश्‍चन

agra-map1आग्रा, [२२ डिसेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘घर वापसी’ अभियानावरून सर्वच राजकीय पक्ष आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया गोंधळ घालत असताना उत्तरप्रदेशच्या आग्रा येथील एका गावात अनेक हिंदू महिलांना बळजबरी करून आणि आमिष दाखवून ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धर्मांतरणाच्या मुद्यावरून भाजपावर टीका करणार्‍या मीडियाने या घटनेकडे मात्र कानाडोळा केला आहे.
आग्रा येथून २० किमी अंतरावर असलेल्या एत्मादपूर येथील एका गावात राहणारे सुमारे दोन हजार लोक हिंदू आहेत. या गावात काही दिवसांपूर्वी ख्रिश्‍चन मिशनरी आले होते. त्यांनी महिलांना आमिष दाखविले. तेव्हापासून या महिला फिरोजाबाद येथील चर्चमध्ये जाऊ लागल्या. त्यांनी ख्रिश्‍चन धर्मही स्वीकारला असून, आता त्यांनी मंदिरात जाणेही सोडून दिले आहे. त्यांनी आपल्या घरात बायबल आणले आणि भिंतीवर येशू ख्रिस्ताचे छायाचित्र लावले.
ही घटना उजेडात आल्यानंतर गावातील पुरुषांनी या धर्मांतरणाचा तीव्र विरोध केला. गरीब असलेल्या या महिला ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या आमिषाला बळी पडल्या, असा आरोप गावकरी करीत आहेत. या महिलांनी स्थानिक वृत्तपत्र प्रतिनिधींना सांगितले की, मिशनर्‍यांनी आमच्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश देण्याचे, नोकरीचे आणि आर्थिक मदतही करण्याचे आमिष दिले होते. तुमच्या हिंदू धर्मात असे काहीच नाही. तुम्ही ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला, तर तुमचे पुढील आयुष्य सुखात जाईल, याची काळजी आम्ही घेऊ. त्यामुळेच आम्ही हिंदू धर्म सोडून ख्रिश्‍चन धर्मात प्रवेश केला, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19175

Posted by on Dec 23 2014. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2312 of 2452 articles)


=केरळातही ‘घर वापसी’= अलपुझा, [२२ डिसेंबर] - विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘घर वापसी’ अभियानांतर्गत रविवारी केरळातील अलपुझा जिल्ह्यात ३० ख्रिश्‍चन नागरिकांनी ...

×