Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » आजचा दिवस १ सेकंदाने वाढणार

आजचा दिवस १ सेकंदाने वाढणार

Digital-Clockमुंबई, [३० जून] – एरवी मुलांना आवाज दिला की आपल्याला उत्तर मिळते एक सेकंद थांब, आलोच, आपण मात्र या सेकंदाने काय बिघडणार आताच ये असे ओरडून मुलांना दटावत असतो. मात्र आज या एक सेकंदाला महत्व आहे. कारण आजचा दिवस हा एका सेकंदाने लांबणार आहे. वाचून आश्‍चर्य वाटत असलं तरी हे सत्य आहे, कारण यंदा एक सेकंद लीप घेतला जाणार आहे.  आज ६० सेकंद दिसणार आहे. जगभरातील घडाळ्यांच्या वेळेचे अचूक नियंत्रण करणार्‍या पॅरिस येथील वेधशाळेने ही घोषणा केली आहे.
२०१५ हे लीप वर्ष नाही, मात्र यावर्षी एक सेकंदाचा लीप येणार आहे. आज ३० जून मंगळवारच्या दुपारी घडाळ्यात ११ः५९: ६० ही वेळ दिसणार आहे. लीप वर्षाचे गणित पूर्ण करण्यासाठी यंदाच्या जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी जास्तीचा एक सेकंद वाढविण्यात येणार आहे.
पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची परिवलन गती दररोज एका सेकंदाच्या दोन हजाराच्या भागाइतक्या गतीने मंदावत चालली आहे. या दोन्हीमध्ये मेळ साधण्यासाठी यावर्षी घड्‌याळी वेळेत एक सेकंद जास्त मोजाले जाणार आहे. फ्रान्समधील ‘इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस’ या वेधशाळेतील वैज्ञानिक पृथ्वीच्या परिवलन गतीवर सातत्याने लक्ष ठेवून असतात व त्यात होणार्‍या बदलानुसार घड्‌याळातील वेळेची जुळणी करीत असतात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23149

Posted by on Jun 30 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1593 of 2453 articles)


=भाजपाध्यक्षांचे प्रतिपादन= अहमदाबाद, [२९ जून] - संपूर्ण जगाला आज भेडसावत असलेल्या सर्वच समस्यांवर केवळ हिंदू धर्मातच तोडगा आहे, असे प्रतिपादन ...

×