Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आज जगाला घडणार भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन

आज जगाला घडणार भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन

=प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप=
Indian-independence-day-paradeनवी दिल्ली, [२५ जानेवारी] – उद्या सोमवारी साजर्‍या होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात अतिरेक्यांचे कुठलेही विघ्न यायला नको, याची परिपूर्ण काळजी घेताना, संपूर्ण राजधानी दिल्लीवर कडेकोट सुरक्षेचे कवच पांघरण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख अतिथी असल्याने यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या सोहळ्यात भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शनही जगाला घडणार आहे. राजपथावर होणार्‍या पथसंचलनात भारताची लढाऊ विमाने, रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन यावेळी जगाला घडणार आहे.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ येथे होणार असल्याने मध्य दिल्लीला पूर्णपणे लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलांच्या सुमारे ४० हजारांवर जवानांनी या भागाचा ताबा घेतला आहे. प्रत्येक गल्ली-बोळात जवान व सशस्त्र पोलिस तैनात असून, १५ हजारांवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. या परिसरातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून, या कक्षात दिल्ली पोलिस, अमेरिकन गुप्तचर सेवा आणि केंद्रीय सुरक्षा दलांचे संयुक्त पथक राहणार आहे.
ओबामा यांच्या ताफ्याचा मार्ग मोकळा राहावा यासाठी वाहतुकीमध्येही बदल करण्यात आला आहे. काही भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आयटीसी मौर्या हॉटेलला लागूनच असलेला सरदार पटेल मार्ग सील करण्यात आला आहे. प्रत्येक उंच इमारतींवर दिल्ली पोलिस आणि एनएसजीचे विशेष जवान तैनात करण्यात आले आहेत. राजपथ परिसराला लागून असलेल्या सुमारे ७१ इमारती सील करण्यात आल्या असून, आजूबाजूच्या उंच इमारतींच्या छतावर जवान तैनात करण्यात आले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20042

Posted by on Jan 26 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2175 of 2453 articles)


=व्हाईट हाऊसचे मत= वॉशिंग्टन, [२४ जानेवारी] - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीने जगातील सर्वात मोठ्या दोन लोकशाही देशांमधील ...

×