Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आज रेल्वेचा अर्थसंकल्प

आज रेल्वेचा अर्थसंकल्प

=रेल्वेची क्षमता वाढविण्यावर प्रभूंचा भर=
railway-budgetनवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] – रेल्वे मंत्री सुरेश प्रभू येत्या गुरुवारी रेल्वेचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या तरतुदीसह रेल्वे क्षेत्राची क्षमता वाढविण्यावर प्रभू यांचा भर राहणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणांना अद्ययावत करण्यासोबतच विद्युतीकरण, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी यार्डांचे आधुनिकीकरण करणे आदी घटकांवर सुरेश प्रभूंचा अर्थसंकल्पात विशेष भर राहणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
रेल्वे क्षेत्राची क्षमता वाढविण्यासाठी अर्थसंकल्पाबाहेरील स्रोतांचा योग्य वापर करण्यावरही प्रभू लक्ष केंद्रित करणार आहेत. हे स्रोत कसे उभारणार आणि त्यांचा वापर कसा होणार, याबाबतची सविस्तर माहिती ते अर्थसंकल्पीय भाषणातून देणार असल्याचे सूत्राचे मत आहे.
केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली येत्या सोमवारी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण, त्यात रेल्वे क्षेत्राच्या गरजा पूर्ण होतील, इतक्या आर्थिक तरतुदी होण्याची शक्यता फार कमी असल्याने, अर्थसंकल्पाच्या बाहेरील स्रोतांचा योग्य आणि प्रभावी वापर करण्याकडेच प्रभू यांचा कल राहणार आहे.
प्रभू यांचा भर सद्या आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणार्‍या प्रकल्पांच्या पूर्णत्वावर राहणार आहे. आर्थिक आणि सामाजिक महत्त्वाच्या प्रकल्पांकरिता राज्य सरकारांसोबत संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने प्रभू यांनी १८ राज्यांना पत्र लिहिले असून, महाराष्ट्र, ओडिशा, केरळ, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड यासारख्या राज्यांनी रेल्वेसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याच्या सामंजस्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26875

Posted by on Feb 25 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (817 of 2453 articles)


=उमर खालिदची कबुली= नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ९ नोव्हेंबर रोजी आयोजित समारंभात आम्ही संसद हल्ल्याप्रकरणी फासावर ...

×