आझम खान मुसलमान नाहीच
Sunday, November 29th, 2015=इमाम बुखारी यांचा दावा=
कानपूर, [२८ नोव्हेंबर] – मुस्लिम मतांवर डोळा ठेवून नेहमीच हिंदूवर टीका करणारे समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांच्यावर जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी जोरदार हल्ला चढविला. आझम खान हे मुसलमान नाहीतच. ते स्वत:ला पृथ्वीवरील ‘खुदा’ समजतात, अशी बोचरी टीका इमाम बुखारी यांनी केली.
कानपूरमध्ये शुक्रवारी आयोजित एका खाजगी कार्यक्रमात बोलताना बुखारी यांनी आझम खान यांना धारेवर धरले. आझम खान प्रचंड गर्विष्ठ आहेत. त्यांना असे वाटते की, आकाशात खुदा आणि जमिनीवर फक्त आझम खान आहे. ते स्वत:ला खुदा समजतात. त्यांचा हा गर्व लवकरच उतरेल आणि ते जमिनीवर येतील, असेही बुखारी म्हणाले.
मुलायम सिंह हे आझम खान यांना घरचा रस्ता दाखवत नसतील, तर २०१७ च्या निवडणुकीत याचा त्यांना फार मोठा फटका बसेल. मुस्लीम एकतर्फी मतदान करतील. मुस्लिमांना जसे सत्ता देण्याचे माहीत आहे, तसेच सत्तेवरून खाली उतरवणेही चांगलेच माहीत आहे, असे बुखारी म्हणाले.
गोहत्या करणार्यांना शिक्षाच मिळावी
भारत सोडून जाण्याची भाषा करणार्या अभिनेता आमिर खानवर बोलण्याचे टाळताना, बुखारी यांनी गोहत्या आणि गोमांस यावर मात्र आपले मत व्यक्त केले. गाईवर हिंदूंची श्रद्धा आहे. हिंदू गाईचे पूजन करतात. त्यामुळे देशात गाईसाठी कायद्याची गरज आहे. गोहत्या करणारे व गोमांस विक्री करणार्यांना शिक्षा मिळायलाच हवी, असेही बुखारी यांनी स्पष्ट केले. रामपूरमध्ये आजही २०० रुपये किलोने गोमांसची विक्री होते, असा आरोपही बुखारी यांनी केला.
इसिसवर बोलताना बुखारी म्हणाले की, तालिबानप्रमाणेच इसिसही अमेरिकेचेच अपत्य आहे. दहशतवाद संपवायचा असेल, तर इसिसचा ताबा असलेल्या ठिकाणांवर हल्ले करा, जिथे सामान्य माणसं राहतात, तिथे हल्ला करू नका. इसिसमधील दहशतवादी हे मुस्लिम नाहीत आणि त्यांचा मुस्लिमांशी काहीही संबंध नाही.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25800

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!