Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आझाद हिंद सेनेचे पुनरुज्जीवन होणार

आझाद हिंद सेनेचे पुनरुज्जीवन होणार

azad_hind_sena_subhashchandकन्नूर, [१३ एप्रिल] – नेताजी या नावाने लोकप्रिय असलेले सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांच्या हेरगिरीचे प्रकरण एकीकडे गाजत असले तरी दुसरीकडे त्यांचे निस्सीम भक्त पुन्हा एकदा इंडियन नॅशनल आर्मी, अर्थात आझाद हिंद सेनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात आहेत. देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडविण्यासाठी नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याच्या ऐतिहासिक घटनेला ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. गेली ३५ वर्षे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करणारे राजीव जोसेफ यांनी हे अग्निदिव्य पार पाडण्याचे ठरविले असून या उपक्रमात नेताजींच्या कुटुंबीयांचा त्यांना पाठिंबा आहे. या सेनेचे स्वरूप प्रामुख्याने सामाजिक मुद्यांना हाताळण्याचे राहणार आहे. शिवाय, या माध्यमातून समाजातील एकात्मतेचा धागा विणून परस्पर सामंजस्याला चालना देण्याचे उद्दिष्टही साकार होणार आहे.
४ जुलै १९४३ रोजी नेताजींनी सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांचा मुख्य उद्देश देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा असला तरी देशाची एकात्मता कायम राखली जावी, असेही त्यांचे मत होते. याच कल्पनेवरून आपल्याला सेनेचे पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना सुचल्याचे जोसेफ यांनी सांगितले आहे. कन्नूर इथे आयोजित एका पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. या योजनेला अंतिम रूप देण्याआधी आपण नेताजींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परवानगी घेतल्याचेही जोसेफ यांनी स्पष्ट केले. कोलकाता इथे गेल्या २३ जानेवारीला नेताजींची भाची कृष्णा बोस आणि पणतू सुगत बोस यांच्या हस्ते सेनेचा लोगो प्रशिद्ध करण्यात आला आहे.
मूळ आझाद हिंद सेनेप्रमाणे या सेनेच्या जवानांनाही गणवेश राहणार असून जोसेफ स्वत:च या सेनेचे कमांडर राहतील. प्रत्येक शहरात एकूण साठ जवानांची एक बटालियन कार्यरत राहणार आहे. याउपक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या बटालियनचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून, येत्या ४ जुलैला पहिले संचलन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सेनेची स्थापना सिंगापूरमध्ये झाली असल्याने पहिले संचलनही सिंगापूरमध्येच करण्यात येईल तर त्यासोबत दिल्ली आणि केरळातही संचलन केले जाणार आहे. या माध्यमातून सेवा आणि एकात्मतेचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील. परदेशातही या सेनेच्या शाखा कार्यरत राहणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22021

Posted by on Apr 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1796 of 2453 articles)


=अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणूक= वॉशिंग्टन, [१३ एप्रिल] - पुढील वर्षी अमेरिकेत होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री हिलरी क्लिटंन यांनी ...

×