Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » आता आला ‘नमो’ ऍण्टी व्हायरस

आता आला ‘नमो’ ऍण्टी व्हायरस

मुंबई, [२४ जून] – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लोकप्रियता मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशात सोशल नेटवर्किंग साईट्‌सचेही योगदान आहे. देशभरात उसळलेल्या ‘मोदी लाटे’चे रूपांतर त्सुनामीत झाल्याचे सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पाहायला मिळाले. मात्र, आता ही लाट सॉफ्टवेअर जगतातही आली असून संगणकातील ‘व्हायरस’ दूर करणारा ‘नमो’हा एक अँटी व्हायरस बाजारात दाखल झाला आहे. ‘इनोवेझिऑन’ नावाच्या कंपनीने या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित करण्यात आलेले ‘नमो’ हे अँटी व्हायरस सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध असून ते आपल्या संगणकावर डाऊनलोड करता येणार आहे. या अँटीव्हायरसमुळे पीसी सुरक्षित राहण्यास मदत होईल, असा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे या‘नमो’चा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काहीही संबंध नसून ‘टेक्नोसॅव्ही’ अशी ओळख असलेल्या मोदी यांनी त्याला मान्यताही दिलेली नाही. मात्र, देशभरातील ‘मोदी लाटे’चा फायदा करून घेण्यासाठी, या अँटी व्हायरस निर्मात्यांनी ही शक्कल लढवली आहे. सॉफ्टवेअरच्या नावामुळे मार्केटिंग तसेच लोकांचे लक्ष वेधून जाहिरात करणेही सोपे होणार आहे. नमो अँटी व्हायरस पीसीचे मालवेअर आणि व्हायरसपासून संरक्षण करेल.
या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी आमचा संबंध नाही. पण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते देशाच्या त्यांच्याकडून असलेल्या प्रचंड अपेक्षांबाबत संदेश देऊ इच्छितात. सध्या या सॉफ्टवेअरचे बेसिक व्हर्जन मोफत असून लवकरच कंपनीची अत्याधुनिक फीचर्ससह नवे पेड व्हर्जन बाजारात आणण्याची योजना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच ‘नमो’ सॉफ्टवेअरकडूनही लोकांना अपेक्षा राहणारच आहेत. मात्र, त्या कितपत खर्‍या ठरतात, हे तर येणारा काळच ठरविणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13775

Posted by on Jun 25 2014. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (2413 of 2466 articles)


=नायजेरिया विजयी, रोनाल्डो व क्लोसे यांचे प्रत्येकी १५ गोल= फोर्टालेझा, [२२ जून] - ब्राझील सुरू असलेल्या विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेत ...

×