Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता आला मोदी आंबा

आता आला मोदी आंबा

=हाजी कलिमुल्ला यांनी तयार केली नवी जात=
modi amba-Haji_kalimullahलखनौ, [२६ मार्च] – गेल्या वर्षभरात देशविदेशात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेने सर्वोच्च शिखर गाठले असून, आतापर्यंत त्यांच्या नावाने वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यात आल्या होत्या. आता फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्याच्या वेगवेगळ्या जाती तयार करण्यात हातखंडा असलेल्या प्रख्यात हाजी कलिमुल्ला यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाने आंब्याचा एक प्रकार तयार केला आहे.
‘‘मोदी यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या प्रकाराच्या झाडाच्या पहिल्या काही फळांची चव स्वत: मोदी यांना चाखता यावी यासाठी मी बाजूला काढून ठेवली आहेत. परंतु, ते आंबे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची माझ्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. नरेंद्र मोदी यांनी फळांच्या राजाची चव चाखावी अशी आपली मनापासून इच्छा आहे’’, असे आंब्याच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कलिमुल्ला यांनी सांगितले. आपण स्वत: नरेंद्र मोदी यांना हा फळाचा राजा भेट द्यावा, अशी मनोमन इच्छा आहे आणि त्यांना याची चव निश्‍चितच आवडेल याची खात्री आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांना या आंब्याची चव आवडल्यास तो माझा फार मोठा सन्मान असेल, असेही ते म्हणाले.
हा आंबा दिसायला खूप सुंदर आहे आणि चवही चांगली आहे, असे राजधानी लखनौच्या सीमेवर आंब्याची बाग असलेले कलिमुल्ला म्हणाले. आंब्याच्या या जातीचे गुजरातमध्ये उत्पादन व्हावे, अशी इच्छा व्यक्त करतानाच कोलकात्याचा प्रसिद्ध हुस्न-ए-आरा आणि लखनौचा दशेरी या प्रकारांपासून मोदी आंबा विकसित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. सातवीनंतर शाळा सोडणार्‍या कलिमुल्ला शिक्षणात माघारले असले तरी आंब्याचे वेगवेगळे प्रकार विकसित करण्याच्या क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमावले आहे. आपल्या शपथविधी समारंभासाठी सार्क सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाने प्रभावित होऊन आपण हा मोदी आंबा विकसित केला, असे कलिमुल्ला यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21738

Posted by on Mar 27 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1845 of 2453 articles)


=राष्ट्रपती मुखर्जी स्वत: वाजपेयींच्या निवासस्थानी जाणार, मालवीय यांचा ३१ मार्चला होणार सन्मान= नवी दिल्ली, [२६ मार्च] - माजी पंतप्रधान व ...

×