Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता एक नेटपॅक वर्षभर वापरा

आता एक नेटपॅक वर्षभर वापरा

=ट्रायची ग्राहकांना खुशखबर=
traiनवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, तसेच नव्या ग्राहकांना जोडण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने नेटपॅकची वैधता आता चक्क वर्षभर वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
सध्या कोणत्याही नेटपॅकची वैधता केवळ ९० दिवसांचीच आहे. ट्रायनेच तसा नियम तयार केला आहे. त्यामुळे प्रीपेड ग्राहकांना ९० दिवसांतून किमान एकदा नेटपॅक रिचार्ज करणे अनिवार्य व्हायचे. इंटरनेटचा नियमित वापर करणार्‍या ग्राहकांना या समस्येला सामोरे जावे लागत होते.
ग्राहकांना या त्रासातून कायमचे मुक्त करण्यासाठी, तसेच नवीन ग्राहकांना आकर्षित करून सध्याच्या ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोबाईलवरील डेटापॅक्सची वैधता जास्तीत जास्त ३६५ दिवसांची करण्याचा निर्णय ट्रायने घेतला आहे. त्यासाठी ट्रायने टेलिकॉम दूरसंचार ग्राहक नियमन कायद्यात दुरुस्ती केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29215

Posted by on Aug 21 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (117 of 2453 articles)


=नागरिकांनी केली स्वातंत्र्याची मागणी= इस्लामाबाद, [१३ ऑगस्ट] - बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर जम्मू-काश्मिरात हिंसाचाराला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला त्यांच्याच नागरिकांनी पुन्हा एकदा ...

×