Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » आता कमी खर्चात डायलेसिस होणार

आता कमी खर्चात डायलेसिस होणार

=मुंबई आयआयटीतील शास्त्रज्ञांचे यश=
dialysis-clinicनवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] – मुंबईतील आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी किडनीग्रस्त रुग्णांसाठी एक विशेष पडदा तयार केला असून त्याचा वापर केल्यास ५० टक्के कमी खर्चात व कमी वेळात डायलेसिस करणे शक्य होणार आहे.
किडनी खराब झाल्यानंतर कृत्रिमपणे मशीनच्या साह्याने रक्तातील अशुद्ध पाणी काढून टाकण्यात येते. भारतात त्यावर उपचार घेण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. पण तो करणे शक्य होत नसल्याने दगावणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे दिल्लीतील आयआयएमने केलेल्या एका पाहणीत दिसून आले. हा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील आयआयटीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञांनी एक पोकळ फायबर पडदा तयार करून त्याची प्रयोगशाळेत चाचणी घेतली असता कमी वेळात व कमी खर्चात डायलेसिस करणे शक्य होत असल्याचे त्यांना आढळले. आता या पडद्याच्या पूर्व वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत असून आगामी तीन वर्षात तो किडनीग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गत दोन वर्षांपासून हा विशिष्ट फायबर पदडा बनवण्याचे काम सुरू होते व आता त्याचे पेटण्टसुद्धा मिळवले असल्याचे समजते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18435

Posted by on Nov 22 2014. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (2338 of 2466 articles)


नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] - आयएनजी वैश्य बँक आता कोटक महिंद्रा बँकेत विलीन झाली आहे. या निर्णयावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले ...

×