Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आता केजरीवाल सरकारचा साखर घोटाळा

आता केजरीवाल सरकारचा साखर घोटाळा

=एसीबीने बजावली नोटीस=
arvind kejriwalनवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] – कांदा घोटाळा करून गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणल्यानंतर दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचा ऐन सणासुदीच्या दिवसात आता कथित साखर घोटाळा उघडकीस आला आहे. बाजारात २५ ते २८ रुपये किलो दराने साखर उपलब्ध असताना केजरीवाल सरकारने मात्र चक्क ३० ते ३३ रुपये किलो दराने साखर खरेदी केली असून, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारला नोटीस बजावली आहे.
आरटीआय कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून हा घोटाळा उजेडात आणला आहे. त्यांनी लगेच हे प्रकरण एसीबीच्या निदर्शनात आणून दिले. एसीबीने सर्व दस्तावेजांचा अभ्यास केल्यानंतर सरकारला नोटीस जारी केली, अशी माहिती एसीबीतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. यामुळे स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचा अरविंद केजरीवाल यांचा दावा अक्षरश: फोल ठरला आहे.
सध्या सणासुदीचा काळ सुरू असल्याने दिल्लीकरांना वितरित करण्यासाठी केजरीवाल सरकारने एक लाख किलो साखर ३३ कोटी रुपये मोजून खरेदी केली. बाजारात साखरेचे भाव इतके जास्त नाहीत. त्यातच नागरिकांना स्वस्त दरात साखर मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडून दिल्ली सरकारला ९० टक्के अनुदानही मिळाले. असे असतानाही, केजरीवाल सरकारने दोन खाजगी कंपन्यांकडून अनुक्रमे ३० व ३३ रुपये किलो दराने साखरेची खरेदी केली.
यापूर्वी, देशभरातच कांदा महागला असताना, केजरीवाल सरकारने नाफेड आणि अन्य काही संस्थांकडून १६ रुपये किलो दराने कांद्याची खरेदी करून दिल्लीकरांना चक्क तो ४० रुपये किलो प्रमाणे विकला होता. या घोटाळ्यातून हे सरकार अद्याप बाहेर आले नसताना, आता साखर घोटाळा उजेडात आल्याने स्वच्छ प्रतिमेचा दावा करणारे केजरीवाल पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25128

Posted by on Oct 15 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1338 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] – लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोदी 'एक्सप्रेस बस' सेवा सुरू करण्यात आली आहे. ही ...

×