Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता दहा दिवसात मिळणार पासपोर्ट

आता दहा दिवसात मिळणार पासपोर्ट

=सर्व प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करा=
Indian Passportनवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] – पासपोर्ट तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च तसेच होणार्‍या अनेक त्रासांपासून लवकरच मुक्ती मिळणार आहे. आता केवळ दहा दिवसातच पासपोर्ट तयार होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी आपल्याला पासपोर्ट कार्यालय किंवा पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही आणि खूप सारे दस्तावेजही जोडावे लागणार नाहीत. सर्व प्रक्रिया घरबसल्याच ऑनलाईन करता येणार आहे.
पासपोर्टसाठी आता केवळ आवश्यक तेवढेच आणि कमीतकमी दस्तावेज लागणार आहेत. ओळखपत्र आणि निवासी दाखला यासारख्या कागदपत्रांसाठी केवळ आधार कार्डची प्रत जोडावी लागणार असून, ही सर्व कागदपत्रेदेखील ऑनलाईनच जोडता येणार आहे. पासपोर्टसाठी आवेदन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला अवघ्या तीन दिवसातच पासपोर्ट कार्यालयाकडून भेटीची वेळ कळविली जाईल. यानंतरच्या सात दिवसात पासपोर्ट त्याला घरपोच प्राप्त होणार आहे.
आतापर्यंत पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आणि प्रचंड विलंब करणारी होती. यात लोकांना प्रचंड त्रासाचाही सामना करावा लागत होता. हा त्रास वाचविण्यासाठी आणि पासपोर्टची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सीताराम यादव यांनी दिली.
यापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीला त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही, याची सत्यापन प्रत जवळच्या पोलिस ठाण्यातून आणावी लागत होती. पोलिस ठाण्यातील कर्मचारी यात बराच विलंब करायचे, त्यामुळे पासपोर्ट मिळायला प्रचंड उशीर लागायचा, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20427

Posted by on Feb 9 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2090 of 2453 articles)


=न्यायालयाचा निर्वाळा= नवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] - कोणतेही आर्थिक उत्पन्न नसणार्‍या पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी नाकारणे, हा आर्थिक अत्याचारच असल्याचा निर्वाळा ...

×