Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता फक्त ४८ तासांत मिळणार पॅन कार्ड

आता फक्त ४८ तासांत मिळणार पॅन कार्ड

PAN - Permanent Account Numberनवी दिल्ली, [२२ एप्रिल] – पॅन कार्ड तयार करण्यासाठी आता १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. आता तुमचे पॅन कार्ड केवळ ४८ तासांत तयार होईल. अशी योजना सरकार लवकरच तयार करणार आहे. ज्यामुळे ऑनलाइन पद्धतीने फक्त दोन दिवसांमध्ये तुमचे पॅनकार्ड तयार होईल. जास्तीत जास्त लोकांनी पॅन कार्ड बनवावे म्हणून जनधन योजनेसारखे अभियान देखील चालवण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यंदाच्या बजेट सत्रात घोषणा केली होती की आता प्रत्येक मोठ्या रकमेच्या देवाण – घेवाणासाठी प्रत्येकाला आपला पॅन क्रमांक देणे अनिवार्य असेल. त्यामुळे पॅन कार्डची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासंदर्भात आणि अनावश्यक कायदे हटवण्यासंदर्भात हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे आता लवकरच पॅन कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना पॅनकार्ड मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने नुकतीच एक अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार , जन्म तारखेचा पुरावा म्हणून मतदान कार्ड आणि आधार कार्ड ग्राहृय धरले जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22217

Posted by on Apr 23 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1761 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२० एप्रिल] - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ मे रोजी चीनच्या भेटीवर जाणार आहेत. या त्रिदिवसीय दौर्‍यावरून ते ...

×