Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आता भाजपा देणार विरोधकांना रोखठोक उत्तर

आता भाजपा देणार विरोधकांना रोखठोक उत्तर

=नवी चमू गठित, एम. जे. अकबर, श्रीकांत शर्मा यांचा समावेश=
mj-akbar1नवी दिल्ली, [८ जुलै] – केंद्रात आणि काही राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात आघाडी उघडणार्‍या विरोधकांची विशेषत: कॉंगे्रसच्या हल्ल्याची धार बोथट करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एक खास चमू गठित केली असून, यात पक्षाचे राज्यसभेतील खासदार एम. जे. अकबर आणि सचिव श्रीकांत शर्मा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
केंद्र सरकारविरोधात वर्षभराच्या काळात एकही ठोस मुद्दा मिळू न शकल्याने विरोधकांनी मिळेल तो मुद्दा हाती घेऊन भाजपावर हल्ल्यांची मालिकाच सुरू केली आहे. भाजपाध्यक्षांनी मात्र विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची व्यूहरचना तयार केली असून, त्याचाच एक भाग म्हणून ही समिती गठित करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपाच्या या चमूत एम. जे. अकबर आणि श्रीकांत शर्मा यांच्यासोबतच सिद्धार्थनाथ सिंह, अनिल बालुनी आणि सुदेश वर्मा यांचाही समावेश असून, ही चमू फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाविरुद्ध आक्रमक झालेल्या विरोधकांचा समाचार घेणार आहे. विरोधकांकडून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप तितक्याच प्रखरपणे फेटाळून लावण्याची महत्त्वाची जबाबदारी या चमूवर आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23302

Posted by on Jul 8 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1575 of 2453 articles)


=मध्य आशियाई देशांचा दौरा, ब्रिक्स परिषद, शांघाय संमेलनासही उपस्थित राहणार= नवी दिल्ली, [६ जुलै] - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी ...

×