Home » ठळक बातम्या, वाणिज्य » आता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक

आता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक

=ईपीएफओचे संकेत : पुढील वर्षी होणार अंमलबजावणी=
EPFO-Indiaनवी दिल्ली, ( १८ जानेवारी) – कंपनीत बदल केल्यानंतर आपल्या भविष्य निर्वाह खात्यातील निधी स्थानांतरित करण्याच्या समस्येपासून इपीएफओच्या सदस्यांना लवकरच मुक्ती मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सुमारे पाच कोटी सदस्यांना कायमचा पीएफ क्रमांक देण्यासाठी पावले उचलली आहेत. पुढील आर्थिक वर्षापासून हे धोरण अंमलात आणण्याचे संकेत ईपीएफओने दिले आहेत.
नोकरीत बदल करताना पीएफ निधी स्थानांतरित करण्यासाठी खातेधारकाला ईपीएफओकडे अर्ज करावा लागतो. प्रत्येक वेळी त्याला नवा खाते क्रमांक दिला जातो. यामुळे उद्भवणार्‍या समस्या लक्षात घेऊन ईपीएफओने एक कृती आराखडा तयार केला असून, तो श्रम मंत्रालयाला पाठविला आहे. कोअर बँकिंग सुविधेप्रमाणे ही प्रणाली काम करणार आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, कायमचा पीएफ क्रमांक मिळाल्यानंतर निधी स्थानांतरित करण्याच्या प्रक्रियेतून त्यांना मुक्तता मिळणार आहे.
पीएफ खातेधारकांना हा कायमचा क्रमांक देण्याच्या प्रणालीवर काम सुरू आहे. पुढील आर्थिक वर्षापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. पीएफ खातेधारकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय पातळीवर सर्व्हर बसवावा लागणार आहे. देशातील १२३ कार्यालये या सर्व्हरसोबत जोडावी लागणार असल्याची माहिती ईपीएफओमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.विशेष म्हणजे, या सुविधेचा सर्वाधिक फायदा बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना होणार आहे. कारण, या क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांचे ठिकाण आणि कंत्राट बदलण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=10325

Posted by on Jan 19 2014. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (2450 of 2455 articles)


कोलकाता, (१७ जानेवारी) - हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयासह देखणेपणाने अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी ...

×