Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता, ‘मेरा आधार, मेरी पहचान’

आता, ‘मेरा आधार, मेरी पहचान’

aadhar-cardनवी दिल्ली, [२ जुलै] – देशवासीयांची ओळख असलेल्या आधार कार्डवरील ‘आम आदमी का अधिकार’ हा शब्द कार्डवरून वगळण्यात आला असून, आता केवळ ‘मेरा आधार, मेरी पहचान’ अशीच या कार्डची टॅगलाईन राहणार आहे. आधारच्या अधिकृत संकेतस्थळावरही आता हीच नवीन टॅगलाईन अपडेट करण्यात आली आहे.
‘आम आदमी का अधिकार’ अशी आतापर्यंत आधारची टॅगलाईन होती. ती बदलण्यात यावी आणि त्याऐवजी ‘मेरा आधार, मेरी पहचान’ असे कार्डवर नमूद करण्यात यावे, अशी मागणी दिल्लीतील असंख्य नागरिकांनी केंद्र सरकारकडे केली होती. यात दिल्ली प्रदेश भाजपाचे प्रवक्ते अश्‍विनी उपाध्याय यांचाही समावेश होता. त्यांनी गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयाला या संदर्भात एक अर्ज दिला होता.
आधार कार्ड हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. तो केवळ आम आदमीपुरता मर्यादित नाही. गरीब आणि श्रीमंत अशा सर्वच नागरिकांची ओळख आहे. त्याद्वारे जात, धर्म, पंथाचे उदात्तीकरण होऊ नये, याकडे उपाध्याय यांनी अर्जातून लक्ष वेधले होते. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून त्यांना २८ जून रोजी पत्र पाठविण्यात आले आणि जुनी टॅगलाईन बदलविण्यात आल्याचे कळविण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29031

Posted by on Jul 3 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (162 of 2453 articles)


अमरावती, [२ जुलै] - पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार होणार असल्याने ४ जुलै रोजी पृथ्वी ही सूर्यापासून सर्वात दूर ...

×