Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता सरकारी सेवेत थेट प्रवेश

आता सरकारी सेवेत थेट प्रवेश

  • ड, क, ब गटांकरिता मुलाखती बंद
  • ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची घोषणा

modi at airनवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] – आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ या सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सरकारी सेवेतील ड, क आणि ब या गटांकरिता मुलाखत घेण्याची प्रथा येत्या १ जानेवारीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. यामुळे केंद्रीय सरकारी सेवेतील ही पदे आता मुलाखतीविना थेट पात्रतेनुसार भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या अनुषंगाने देशाला संबोधित करताना मी शासकीय सेवेतील या गटांकरिता मुलाखतीची प्रथा कायमची बंद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज मी तशी औपचारिक घोषणा करीत आहे. कारण, या पदांसाठी नोकर भरती करताना सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आले आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
या कनिष्ठ पदांकरिता मुलाखतीची प्रथा कायमची संपुष्टात आणण्याची औपचारिकता सरकारने जवळजवळ पूर्ण केली आहे. केंद्र सरकारमधील या अराजपत्रित पदांकरिता येत्या १ जानेवारीपासून मुलाखती घेण्यात येणार नाहीत. या पदांसाठी पात्रता असतानाही दलालांकडून गरिबांची प्रचंड लूट होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच ही प्रथा बंद करण्याचा आणि केवळ योग्य व पात्र उमेदवारांनाच थेट नोकरी देण्याचे धोरण आपल्या सरकारने स्वीकारले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
अनेकदा परिस्थिती नसतानाही गरीब लोक ही पदे प्राप्त करण्यासाठी पैशाची जमवाजमव करीत असतात. त्यांना नोकरीचे आमिष दिले जाते. पण, पैसे घेतल्यानंतर दलाल त्यांची फसवणूक करतात. या कनिष्ठ पदांकरिता खरोखरच मुलाखतीची आवश्यकता आहे का, असा प्रश्‍न माझ्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने डोकावत आहे. अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या मुलाखतीत समोर बसलेल्या उमेदवाराची परिपूर्ण पारख करू शकणार्‍या मानसशास्त्राविषयी मी अद्याप तरी ऐकले नाही. मग, सरकारी नोकर्‍यांमध्ये मोठमोठ्या पदांवर बसलेले सरकारी बाबू त्यांची अचूक पारख कशी करू शकतात. ही प्रथा बंद करण्यात आल्याने याचा सर्वाधिक फायदा पात्र उमेदवारांना मिळणार आहे. कारण, त्यांना आता कोणत्याही मोठ्या व्यक्तीची शिफारस आणावी लागणार नाही आणि दलालांचे खिसेही भरावे लागणार नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
विविधता हेच भारताचे सौंदर्य
देशातील काही भागांमध्ये जातीयतेवर आधारित घटना घडत असताना, पंतप्रधान मोदी यांनी जाती व धर्मांची विविधताच आपल्या देशाचे खरे सौंदर्य आहे. विचार आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून एकतेचा मंत्र घरोघरी जायला हवा, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे उदाहरण दिले. शांतता, सलोखा आणि एकता हेच कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मुख्य घटक असल्याने वल्लभभाई पटेल यांनी नेहमीच विविधतेतील एकतेवर भर दिला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25337

Posted by on Oct 26 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1277 of 2453 articles)


नितीश, लालूंमुळेच बिहार मागासला पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल छपरा, [२५ ऑक्टोबर] - मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तांत्रिकाच्या भेटीचा, तसेच मी ...

×