Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आता २६ आठवड्यांची प्रसूतिरजा

आता २६ आठवड्यांची प्रसूतिरजा

=राज्यसभेतही विधेयक पारित=
ChildFirstAndAlways DELIVERYनवी दिल्ली, [११ ऑगस्ट] – गर्भवती महिलांना १२ ऐवजी २६ आठवड्यांची मातृत्व रजा देण्याची तरतूद असलेले विधेयक गुरुवारी राज्यसभेत पारित करण्यात आले.
नोकरी किंवा कामानिमित्त बाहेर पडणार्‍या महिलांची गरज लक्षात घेता ही तरतूद करण्यात आली आहे, असे श्रम व रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी प्रसूति प्रसुविधा (दुरुस्ती) विधेयक २०१६ वर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितले. १८ लाख महिलांना याचा फायदा मिळणार आहे.
दोन मुलांपर्यंत प्रसूती रजा २६ आठवड्यांची राहणार असून, त्यानंतर ती १२ आठवड्यांची असेल. मातेला घरूनच काम करणे शक्य व्हावे यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही विधेयकात भर देण्यात आला आहे. ५० पेक्षा अधिकारी कर्मचारी असलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना बालगृहाची (क्रेच) व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आई व मुलाला चांगले जीवन प्रदान करणे हा एक अतिशय गंभीर व महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या दृष्टीने हे विधेयक खूपच फायदेशीर ठरणार आहे, असे बंडारू दत्तात्रेय यावेळी म्हणाले. नॉर्वे (४४) आणि कॅनडा (५०) या देशांनंतर प्रसूति रजा देण्याच्या बाबतीत भारत आता तिसर्‍या क्रमांकावर आला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रसूति रजा कायदा (१९६१) मध्ये सुधारणा करून प्रसूति रजा (दुरुस्ती) कायदा २०१६ मांडण्याला मान्यता दिली होती, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. या विधेयकातील दुरुस्त्या मेनका गांधी यांच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने तयार केल्या आहेत. मात्र, श्रम व रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी हे विधेयक वरिष्ठ सभागृहात मांडले.
दोन वर्षांच्या कठोर परिश्रमाचा हा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया मेनका गांधी यांनी व्यक्त केली आहे. गर्भवती महिलांसाठी सात महिन्यांच्या प्रसूति रजेची मागणी करण्यात आली होती. परंतु, ही रजा सहा महिने करून सार्वजनिक व खाजगी क्षेत्रालाही ती बंधनकारक करण्यात आली आहे, असेही गांधी म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29190

Posted by on Aug 12 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (126 of 2453 articles)


=सुषमा स्वराज पाकवर बरसल्या= नवी दिल्ली, [११ ऑगस्ट] - अतिरेक्यांचे उदात्तीकरण आम्हाला मुळीच मान्य नसून, पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ ...

×