Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आधार कार्डला मिळणार घटनात्मक दर्जा

आधार कार्डला मिळणार घटनात्मक दर्जा

aadhar-cardनवी दिल्ली, [२९ फेब्रुवारी] – यंदाच्या अर्थसंकल्पातून आधार कार्डशी संबंधित मोठी घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. यापुढे आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्यात येणार आहे. या घोषणेनंतर आधारकार्डचा वापर करणार्‍या सर्वच नागरिकांना याचा लाभ घेता येणार असल्याचे जेटली यांनी त्यांच्या भाषणात म्हटले.
यंदाच्या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू मुळातच सर्वसामान्य नागरिक असल्याचे अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलच जेटली यांनी सांगितले होते. त्यामुळे आधारकार्डबाबतची घोषणा ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरणार आहे. जेटलींनी याची घोषणा करताना म्हटले की, सरकारकडून देण्यात येणार्‍या सबसिडीचा उपयोग आधार कार्डच्या माध्यमातून सरळसरळ नागरिकांना मिळणार आहे. तसेच आधारकार्डला घटनात्मक दर्जा देण्यासोबतच सरकारकडून यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येणार आहेत. याचा फायदा हा त्या लोकांनाच मिळायला हवा ज्यांना त्याची गरज आहे.
आतापर्यंत ९८ कोटी आधारकार्ड तयार करण्यात आल्याचेही जेटली यांनी यावेळी सांगितले. दररोज २६ लाख बायोमेट्रिक आणि १.५ लाख ई-केवायसीची पूर्तता करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यसभेत अगोदरच राष्ट्रीय ओळख प्राधिकरण विधेयक प्रलंबित आहे त्यामुळे यावर किती आणि कशा प्रकारे सरकार काम करेल, हे पाहणे महत्त्वाचेे ठरणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26962

Posted by on Feb 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (791 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] - केंद्रीय अर्थसंकल्पातून ग्रामीण आणि गरिबांच्या विकासावर भर देण्यात आल्यानंतर, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना ‘थोडा आनंद... थोडे ...

×