Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आधार विधेयकाला लोकसभेची मंजुरी

आधार विधेयकाला लोकसभेची मंजुरी

aadhar-card1नवी दिल्ली, [११ मार्च] – आधार विधेयकामुळे नागरिकांची गोपनीय माहिती सार्वजनिक होण्याची तसेच त्याचा दुरुपयोग होण्याची आशंका फेटाळून लावत कल्याणकारी योजनांचा फायदा गरीब तसेच सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचावा, हीच या विधेयकामागची सरकारची भूमिका असल्याचा निर्वाळा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शुक्रवारी दिला. त्यानंतर या विधेयकाला लोकसभेने मंजुरी दिली.
या विधेयकामागे सरकारचा कोणताही छुपा अजेंडा नाही, तसेच यात सर्वसामान्य माणसाची गोपनीयता जतन करण्याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे, असे स्पष्ट करीत जेटली यांनी सरकारी योजनांमधून होणारी आर्थिक गळती थांबावी, तसेच कल्याणकारी योजनांचा फायदा थेट सर्वसामान्य माणसाला मिळावा, हीच या विधेयकामागची सरकारची भूमिका आहे, असे सांगितले.
या विधेयकामागची मूळ कल्पना संपुआ सरकारची आहे, मात्र त्यावेळीही गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित झाला होता, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, या विधेयकात कलम ६ जोडण्यात आले, जे गोपनीयतेच्या मुद्याशी संबधित आहे. त्यानुसार काही माहिती व्यक्तीच्या सहमतीने जाहीर केली जाऊ शकते, मात्र बायोमेट्रिकशी संबंधित माहिती त्या व्यक्तीने सहमती दिल्यानंतरसुद्धा जाहीर करता येणार नाही. खाजगी कंपन्यांनाही अशी माहिती देता येणार नाही. हे विधेयक पारित करावे, अशी विनंती जेटली यांनी केली. तत्पूर्वी विरोधकांनी हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविण्याची मागणी केली. हे विधेयक राज्यसभेत न पाठवता पारित करता यावे, म्हणून त्याला वित्त विधेयकाचे स्वरुप देण्यात आल्याचा आरोपही विरोधी सदस्यांनी केला. कॉंग्रेसचे राजीव सातव यांचे यावेळी चांगले भाषण झाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27231

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (694 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१२ मार्च] - भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई हे शहर राहण्यासाठी नेपाळची राजधानी काठमांडूपेक्षाही स्वस्त आहे. ‘इकॉनॉमिस्ट’च्या इन्टेलिजन्स ...

×