Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आपच्या २१ आमदारांचा निर्णय जुलैमध्ये

आपच्या २१ आमदारांचा निर्णय जुलैमध्ये

=लाभाचे पद: निवडणूक आयोग करणार सुनावणी=
ElectionCommissionOfIndiaनवी दिल्ली, [२७ जून] – कायद्यात तरतूद नसतानाही संसदीय सचिव या लाभाच्या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पार्टीच्या २१ आमदारांचे भवितव्य पुढील महिन्यात ठरणार आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आमदारांनी लाभाचे पद स्वीकारल्यास चौकशीत स्पष्ट झाल्यास या सर्वांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते. आयोगाने गेल्या महिन्यात या सर्व आमदारांना नोटीस जारी केली होती. त्यावर आम्ही आयोगापुढे व्यक्तिश: उपस्थित राहून उत्तर सादर करू, अशी विनंती आमदारांनी केली होती. आयोगाने ती मान्य केली असून, १४ जुलैपासून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
संसदीय सचिव हे लाभाचे पद असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका वकील प्रशांत पटेल यांनी आयोगाकडे सादर केली होती. तर, या पदावर काम करताना आम्ही एक पैशाचाही फायदा घेतला नाही. एका पैशाचाही लाभ आणि अधिकार नसलेले हे पद असल्याचा दावा या आमदारांनी केला आहे.
या आमदारांची संसदीय सचिव म्हणून नियुक्ती केल्यानंतर केजरीवाल सरकारने ते मंजुरीसाठी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे पाठविले होते. तिथून विधेयक केंद्र सरकारकडे गेल्यानंतर ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर करण्यात आले होते. याच महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रपतींनी ते विधेयक मंजूर करण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींच्या संदर्भाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28964

Posted by on Jun 28 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (172 of 2452 articles)


लखनौ, [२७ जून] - येथील प्रदेश भाजपा मुख्यालयात रविवारी आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी ...

×