Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » आपण प्रतीक्षा करायलाच हवी

आपण प्रतीक्षा करायलाच हवी

=राजनाथसिंह यांची भूमिका=
RAJNATH_SINGH_19नोएडा, [१२ जानेवारी] – पठाणकोट येथील वायुसेनेच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सूत्रधारांवर कारवाई करण्याचे ठोस आश्‍वासन पाकिस्तान सरकारने दिले असल्याने, या देशावर आपण अविश्‍वास ठेवण्याचे काहीच कारण नाही, त्यासाठी पाकिस्तानला थोडा वेळ देऊन आपण प्रतीक्षा करायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी येथे विशद केली.
पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाईचे ठोस आश्‍वासन दिले असल्याने, या देशाला थोडा वेळ देऊन आपण प्रतीक्षा करायलाच हवी, असे राजनाथसिंह यांनी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पठाणकोट हल्लेखोरांना शिक्षा करण्यासाठी पाक सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. भारताने जे पुरावे दिले आहेत, त्याच्या अभ्यासासाठी पाकने संयुक्त तपास पथकही गठित केला आहे. भारत आणखीही काही पुरावे या देशाला सादर करणार आहे, असे राजनाथसिंह म्हणाले.
या देशाने तपासाला सुरुवात केली असून, काही संशयितांना अटकही केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच जर आपण त्यांच्यावर अविश्‍वास दाखविला, तर चौकशीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चर्चा रद्द नाही
दरम्यान, पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत-पाक विदेश सचिव स्तरावरील चर्चेवर कुठलाही परिणाम होणार नसून, ठरल्याप्रमाणेच ही चर्चा घेण्यात येणार असल्याची माहिती पाक सरकारमधील उच्चस्तरीय सूत्राने दिली.
आवाजाचे नमुने मागणार
अतिरेक्यांनी हल्ल्याच्या काळात दोन मोबाईल क्रमांकावर सातत्याने बोलणे केले. हे क्रमांक पाकिस्तानचे असल्याचा भारताचा दावा आहे. भारतीय तपास संस्थांनी अतिरेक्यांचे बोलणेही रेकॉर्ड केले असल्याने आम्ही भारताकडे अतिरेक्यांच्या आवाजाचे नमुने मागणार आहोत, असेही सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26495

Posted by on Jan 13 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (920 of 2453 articles)


जळगाव, [१० जानेवारी] - देशातल्या सर्वात मोठ्या प्रस्तावित जलपुनर्भरण प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गंगा जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी ...

×