Home » ठळक बातम्या, मराठवाडा » ‘आप’ला मोदींची धास्ती

‘आप’ला मोदींची धास्ती

=लतादीदींनी ‘ऍम्बेसेडर’ होऊ नये मेधा पाटकर=
medha patkarऔरंगाबाद, (२३ मार्च) – भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेची धास्ती देशातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यातच स्वत: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही मोदी यांना आशीर्वाद दिले असल्याने विरोधकांची झोपच उडाली आहे. त्याला आम आदमी पार्टीही (आप) अपवाद नाही. मोदींचा रथ रोखणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन ‘लतादीदींनी मोदी यांचे ऍम्बेसेडर बनू नये,’ असा सल्ला ‘आप’च्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिला आहे.
लता मंगेशकर यांच्यावर सर्वजण प्रेम करतात. त्यांनी नरेंद्र मोदी यांचे ऍम्बेसेडर बनू नये. कारण, गुजरातचा विकास झाला, हे चित्र फसवे आहे. वास्तव वेगळेच आहे, ते लतादीदींनी पाहावे. लतादीदींविषयी असलेल्या प्रेमापोटीच, ही अपेक्षा करीत असल्याचेही पाटकरांनी नमूद केले.
औरंगाबादच्या सन्मित्र कॉलनी येथे आम आदमी पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन शनिवारी मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. गारपिटीमुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेला शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी प्रस्थापित राजकीय पक्षांचे नेते जाहीर सभांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. संवेदनाशून्य राजकारण होत आहे, अशी टीकाही पाटकर यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=12226

Posted by on Mar 24 2014. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (2431 of 2454 articles)


चेन्नई, (२२ मार्च) - पुढील काही महिन्यांत भारतीय खाजगी विमानक्षेत्रात सेवा सुरू करणार्‍या एअर आशियाच्या ताफ्यातील पहिले विमान आज भारतात ...

×