Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ‘आपले सरकार वेबपोर्टल’चे लोकार्पण

‘आपले सरकार वेबपोर्टल’चे लोकार्पण

=२१ दिवसात तक्रारींचे निराकरण करणार=
Devendra-Fadnavis-6मुंबई, [२७ जानेवारी] – ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रारी आणि अभिप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, या तक्रारींचे २१ दिवसात निराकरण केले जाईल. सुशासनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल. माहिती अधिकाराचा कायदा ऑनलाईन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, सामान्यांना कालबद्ध सेवा देण्यासाठी ‘सेवा हमी विधेयक’ आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
आपल्या तक्रारी शासनाकडे मांडण्याकरिता किंवा शासनाचे कामकाज, धोरणासंबधी जनतेला सूचना-अभिप्राय देण्याकरिता १०० दिवसात वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात येईल, या जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करीत प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे लोकार्पण सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
उपस्थितांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाचा जनतेशी संवाद साधला जावा याकरिता वेबपोर्टल सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. ‘आपले सरकार’ वेब पोर्टल सुरू करून त्याची आज पूर्तता करण्यात आली आहे. ‘आपले सरकार’च्या माध्यमातून शासन आणि जनता यांचा थेट संवाद होणार असून, जनतेला आपल्या तक्रारी मांडण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सध्या मंत्रालयीनस्तरासाठी असलेले हे वेब पोर्टल टप्प्याटप्प्याने विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरही सुरू करण्यात येईल. पारदर्शकता आणि गतिमानता या दोघांचा वापर करून सुशासन देणे शक्य होते. तसाच प्रयत्न राज्यात डिजीटल महाराष्ट्र मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जनतेला कालबद्ध सेवा देण्यासाठी सेवा हमी विधेयक आणण्यात येणार असून, हे विधेयक लोकमतासाठी खुले करण्यात आले आहे. आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येईल. सेवा हमी विधेयक संमत झाल्यानंतर त्यामाध्यमातून जनतेला कालबद्ध सेवा देण्यात येतील. सेवा हमी विधेयकाच्या सेवा या ‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येतील. या वेब पोर्टलवर तक्रारींचा ओघ वाढेल त्यासाठी डिजीटल नेटवर्क उभे करावे जेणेकरून जनतेला सेवा देताना अडचणी निर्माण होणार नाहीत. हल्ली सर्वत्रच मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे या माध्यमाचा वापर जनतेला अधिक चांगली सेवा देण्यासाठी करून सुशासनाची अंमलबजावणी करताना लोकाभिमुखता येणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने २०१५ हे डिजीटल वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे आता मंत्रालयस्तरावर फाईल्स डिजीटल स्वरूपातच स्वीकारल्या जातील. त्यासाठी एक निश्‍चित तारीख ठरविण्यात येईल, त्यानंतर मात्र, ई-फाईल्स व्यतिरिक्त अन्य स्वरूपातल्या फाईल्स स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
‘आपले सरकार’ या वेब पोर्टलच्या कार्यपद्धती बाबतची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमास खासदार राजू शेट्टी, विनायक मेटे मंत्रालयातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20100

Posted by on Jan 28 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (2162 of 2451 articles)


=केंद्र सरकारची योजना= नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - स्त्रीभृण हत्यांच्या वाढत्या घटना रोखण्यासाठीआणि महिलांना समाजात सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×