Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आपल्या नावाने मंदिर उभारल्यामुळे मोदी नाराज

आपल्या नावाने मंदिर उभारल्यामुळे मोदी नाराज

=स्रोतांचा वापर स्वच्छ भारतासाठी करण्याचे आवाहन=
narendra-modi33नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] – गुजरातच्या राजकोट शहराच्या सीमेवर आपल्या नावाने मंदिर उभारण्यात आल्याचे वृत्त गुरुवारी ठळकपणे प्रसिद्ध झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार भारतीय परंपरेविरोधात असल्याचे मत व्यक्त केले आहे.
माझ्या नावाने मंदिर उभारण्यात आल्याचे वृत्त ऐकून मला धक्काच बसला. ही बाब भारताच्या महान परंपरेविरोधात आहे, असे पंतप्रधानांनी गुरुवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अशाप्रकारे मंदिर उभारणे आमची संस्कृती आम्हाला कधीच शिकवत नाही. हे वृत्त ऐकून मला खूप दु:ख झाले. ज्यांनी कुणी असे केले असेल त्यांनी मुळीच तसे करू नये, अशी माझी नम्र विनंती आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ज्यांनी कुणी हे मंदिर उभारले त्यांनी असे करण्यापेक्षा यासाठी दिलेला वेळ आणि स्रोतांचा स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोग करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मंदिर उभारणार्‍यांनी हा निर्णय रद्द केला असून, त्याठिकाणी भारत मातेची प्रतिमा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कोठारिया मार्गावर हे मंदिर उभारण्यात आले असून, येत्या १६ फेब्रुवारी रोजी त्याचे उद्‌घाटन करण्यात येणार होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20514

Posted by on Feb 13 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2071 of 2453 articles)


=हिंदू सेवाभावी व परोपकारी समाज : सरसंघचालकांचे आवाहन= खरगौन, [११ फेब्रुवारी] - हिंदू हा सेवाभावी आणि परोपकारी समाज आहे. भारताला ...

×