|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 5.72 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.24°C - 31.24°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.71°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.23°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.17°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.68°C - 29.85°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » ‘आप’ सोडण्यासाठी माझ्यावर दबाव

‘आप’ सोडण्यासाठी माझ्यावर दबाव

=मयंक गांधी यांचा आरोप=
mayank gandhiनवी दिल्ली, [७ मार्च] – प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याची टीका आपण केल्यानंतर आम आदमी पार्टीतील एक शक्तिशाली गट मी पक्षातून बाहेर पडावे, यासाठी दबाव आणत आहे, असा स्पष्ट आरोप पक्षाचे वरिष्ठ नेते मयंक गांधी यांनी केला आहे.
भूषण आणि यादव यांची अलीकडेच पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला. या कारवाईचा आपण निषेध केला होता. यासाठी पक्षातील काही नेत्यांनी मला बदनाम करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. मी पक्षविरोधी आणि अरविंद केजरीवालविरोधी आहे, असे चित्रही सोशल मीडियावर रेखाटण्यात येत आहे, असे मयंक गांधी यांनी आपल्या ब्लॉगवर नमूद केले आहे. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनाही या नेत्यांनी अशाच प्रकारे बदनाम केले होते. त्यांनी पक्षातून बाहेर निघावे, यासाठी दबावही आणण्यात आला होता. पण, पक्षाचा राजीनामा न देता त्यांनी या नेत्यांची खेळी त्यांच्यावरच उलटवली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पक्षाने मला एका समितीवरून हटविले आहे. आशीष खेतान आणि त्यांच्या चौकडीतील काही लोक यात सहभागी आहेत. याची फार मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Posted by : | on : 8 Mar 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g